शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
4
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
6
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
7
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
8
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
9
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
10
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
11
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
12
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
13
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
14
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
15
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
16
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
17
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
18
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
19
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
20
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
Daily Top 2Weekly Top 5

गॅलरीच्या ग्रिलवर चढून पेंटींगचे काम; तोल जाऊन पडून कामगाराचा मृत्यू, ठेकेदाराचा हलगर्जीपणा समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 13:03 IST

कामाच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेची कोणतीही साधने न पुरवता हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला

पुणे : इमारतीच्या गॅलरीच्या ग्रिलवर चढून पेंटींगचे काम करत असताना तोल जाऊन खाली पडल्याने एका पेंटरचा मृत्यू झाल्याची घटना कोथरूड परिसरात घडली आहे. कामगारांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी कोथरूडपोलिसांनी ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे. जगतमुरत गुलाब निषाद (वय ३०, रा. केळेवाडी, कोथरुड, मूळ-उत्तर प्रदेश ) असे पेंटींग करताना खाली पडून मृत्यू झालेल्या पेंटरचे नाव आहे. तर अनिकेत ज्ञानेश्वर गढई (वय २५, रा. कर्वे रोड) आणि यशवंत प्रभाकर देशपांडे (वय ५३, रा. कर्वेनगर ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरुड परिसरातील रामबाग कॉलनी उमा महेश को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीत इमारतीच्या पेंटींगचे काम सुरू होते. त्याठिकाणी जगतमुरत २० एप्रिल रोजी गॅलरीच्या ग्रिलवर उभा राहून पेंटींग काम करत होता. त्यावेळी त्याचा तोल जाऊन तो खाली पडला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, अनिकेत गढई व यशवंत देशपांडे इमारतीचे पेंटींगचे काम घेणारे ठेकेदार आहेत. त्यांनी कामाच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेची कोणतीही साधने न पुरवता हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक आर. आर. आडगळे करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूEmployeeकर्मचारीPoliceपोलिसkothrudकोथरूड