शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

"ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले आहे, राज्य सरकारचे कान फाटतील एवढ्या जोरात आंदोलन करणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2021 15:34 IST

भारतीय जनता पार्टी 26 जूनच्या आंदोलनसाठी तयार, पंकजा मुंडे यांचा इशारा

ठळक मुद्दे मराठा आणि ओबीसी आरक्षण हा राज्याशी संबंधित विषय आहे. आरक्षणाबाबत केंद्राकडे सतत बोट दाखवून चालणार नाही

पुणे: सर्वोच न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. ही अत्यंत खेदजनक आणि संतापजनक घटना घडली. आता भारतीय जनता पक्ष सरकारला वेळ देणार नाही. सरकारचे कान फाटतील एवढ्या जोरात 26 जूनच्या आंदोलनसाठी आम्ही तयार झालो आहोत. असा इशारा माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षण निर्णयाबाबत पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.  यावेळी  महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, ओबीसी प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर उपस्थित होते. 

राज्य सरकारने वेळेत कागदपत्र सादर न केल्यामुळे हे आरक्षण धोक्यात आले. त्यामुळे महाराष्ट्रातून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी  बैठक घेऊन ओबीसी विषयावर चर्चा आणि भूमिका ठरवली होती. वेळ देऊनही सरकारकडून वेळकाढूपणा केला जातोय. मराठा समाजाला आरक्षण देण्यात राज्य सरकार अपयशी ठरले. मात्र ओबीसी ला तर आता आम्ही मिळवून देऊच. अशी भूमिका घेत आरक्षण रक्षणार्थ रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सरकारने टिकण्यापालिकडे जनहिताचे निर्णय घेतले नाहीत. ग्रामीण विकास मंत्री असताना हा विषय मीच हाताळत होते. 50 टक्के आरक्षण आहे. इमपीरिकल डाटा द्यायला वेळ मागितली होती. 31 जुलै 2019 रोजी अध्यादेश काढून या सरकारने लंपास ठरवला. न्यायालयाकडे तारखा मागत गेले. डाटा न्यायालयासमोर सादर केला नाही. ताशेरे ओढून निर्णय घेतला. सरकारने कारवाई करणे आवश्यक आहे. लवकरात लवकर याचिका करून इमपीरिकल डाटा सादर करावा, जिल्हानिहाय टास्क फोर्स करून डाटा गोळा करा, अन्यथा निवडणुका होऊ देणार नाही. ही ठाम भूमिका असल्याचे त्या म्हणाल्या आहेत. 

राज्य सरकार केंद्रकडे बोट दाखविणे चूक, जनागणानेशी काहीही संबंध नाही. इमपीरिकल डाटाच्या आधारावर रिपोर्ट सादर करावा असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. जनगणना हा शब्द नाही. हा डाटा राज्य सरकारचा मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मिळवू शकतो. असेही त्यांनी सांगितले आहे. मंत्र्यांना निर्णय घेण्याचे अधिकार असताना आंदोलन का करताय? 

मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हा राज्याशी संबंधित विषय आहे. आरक्षणाबाबत केंद्राकडे सतत बोट दाखवून चालणार नाही. सत्तेतील मंत्र्यांना निर्णय घेण्याचे अधिकार असताना त्यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ का येत आहे. असा सवाल मुंडे यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

टॅग्स :PuneपुणेPankaja Mundeपंकजा मुंडेreservationआरक्षणBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारCourtन्यायालयMaratha Reservationमराठा आरक्षण