शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 09:14 IST

Crop Insurance News: पीक विमा हा मागील काही वर्षांपासून वाद व चर्चेचा विषय ठरला आहे. त्याची कारणेही तशीच आहे. पीक विमा कंपन्यांनी सन २०१६ ते २०२५ या नऊ वर्षांमध्ये देशभरात एकूण ७३ हजार ६३० काेटी रुपये तर महाराष्ट्रात १६ हजार ३०० काेटी रुपये कमावले आहे.

- सुनील चरपेनागपूर - पीक विमा हा मागील काही वर्षांपासून वाद व चर्चेचा विषय ठरला आहे. त्याची कारणेही तशीच आहे. पीक विमा कंपन्यांनी सन २०१६ ते २०२५ या नऊ वर्षांमध्ये देशभरात एकूण ७३ हजार ६३० काेटी रुपये तर महाराष्ट्रात १६ हजार ३०० काेटी रुपये कमावले आहे. तज्ज्ञांच्या मते, कंपन्यांचा हा निव्वळ नफा नाही. पुनर्विमा, प्रशासकीय व परिचलन खर्च व जीएसटी वजा जाता या कंपन्यांनी नऊ वर्षांत किमान २१ ते २८ हजार काेटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.

देशात १९९९-२००० च्या रबी हंगामापासून पीक विमा याेजना लागू करण्यात आली. हवामानातील बदलांमुळे पिकांच्या हाेणाऱ्या नुकसानीतून शेतकऱ्यांना विमा कवचच्या रुपाने दिलासा मिळावा हा या याेजनेमागचा मुख्य उद्देश आहे. राष्ट्रीय कृषी विमा याेजना नावाने ओळखल्या जाणाऱ्या या याेजनेत २०१०-११ मध्ये काही सुधारणा करण्यात आल्या. १३ जानेवारी २०१६ पासून ही याेजना प्रधानमंत्री पीक विमा नावाने ओळखली जाऊ लागली. आधी शेतकऱ्यांना ८ ते १५ टक्के प्रीमियम भरावा लागायचा, ताे २०१६ पासून १.५ ते ५ टक्के करण्यात आला.

देशात सध्या २० पीक विमा कंपन्या कार्यरत असून, त्यात १५ खासगी तर ५ सरकारी कंपन्या आहेत. या नऊ वर्षात विमा कंपन्यांनी देशातील ७८.४१ काेटी शेतकऱ्यांकडून प्रीमियम स्वीकारले. यातील २२.६७ काेटी शेतकऱ्यांना १,९२,४२० काेटी रुपयांचे नुकसान भरपाई क्लेम दिले. या काळात महाराष्ट्रातील ६.२४ काेटी शेतकऱ्यांना ४०,५०० काेटी रुपयांचे दावे देण्यात आले.

कंपन्यांचा निव्वळ नफादेशातील पीक विमा कंपन्यांनी नऊ वर्षांत ७३,६०० काेटी रुपये कमावले असले तरी त्यांनी त्यांच्या जाेखिमेसाठी २५ ते ३० हजार काेटी रुपये इतर बहुराष्ट्रीय कंपन्यांना दिले. १० ते १२ टक्के त्यांच्या प्रशासकीय (कर्मचारी वेतन, पंचनामे) व परिचालन यावर खर्च केले. या रकमेवरील १८ टक्के जीएसटी केंद्र सरकारला दिला. ही रक्कम वजा करता कंपन्यांनी २१,५४१ ते २८,०१३ काेटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला.

English
हिंदी सारांश
Web Title : Crop insurance firms profit hugely from farmers' premiums: ₹73,630 Cr

Web Summary : Crop insurance companies amassed ₹73,630 crore in nine years, nationwide. After expenses, their net profit is estimated between ₹21,541 to ₹28,013 crore. Farmers paid lower premiums, but companies profited immensely from the scheme.
टॅग्स :Crop Insuranceपीक विमाMaharashtraमहाराष्ट्र