Join us
Daily Top 2Weekly Top 5

जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 09:43 IST

Donald Trump Tariff From July: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जणू जगाला शांत बसू न देण्याची शपथ घेतली आहे. इराणसोबत सुरू असलेलं युद्ध अद्याप थांबलेलं नसतानाच, त्यांच्याकडून एका नवीन संकटाची घोषणा करण्यात आली आहे.

Donald Trump Tariff From July: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जणू जगाला शांत बसू न देण्याची शपथ घेतली आहे. इराणसोबत सुरू असलेलं युद्ध अद्याप थांबलेलं नसतानाच, त्यांच्याकडून एका नवीन संकटाची घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचं जुनं टॅरिफ जुलैपासून पुन्हा लागू होईल. अमेरिकन सर्वोच्च न्यायालयानं पूर्वीच्या टॅरिफचा निर्णय फेटाळला असला तरी, ट्रम्प हे 'बॅक डोअर'नं ते लागू करणार आहेत. जर त्यापूर्वी भारत आणि अमेरिका यांच्यात कोणताही व्यापार करार झाला नाही, तर याचा परिणाम भारतावरही दिसून येईल.

सेक्शन ३०१ चा आधार आणि न्यायालयाचा निकाल

आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून टॅरिफ धोरणावर धक्का बसला होता, परंतु त्यावर आता मार्ग शोधण्यात आला आहे. ट्रम्प प्रशासनाने 'सेक्शन ३०१' अंतर्गत जगातील अनेक देशांच्या व्यापाराचा अभ्यास सुरू केला होता. हा अभ्यास आता पूर्ण झाला असून, जुलैपासून जुने टॅरिफ पुन्हा लागू करण्याची तयारी आहे, असं बेसेंट म्हणाले. वॉशिंग्टनमध्ये 'वॉल स्ट्रीट जर्नल'शी बोलताना बेसेंट यांनी सांगितलं की, सेक्शन ३०१ अंतर्गत असलेल्या टॅरिफ अधिकारांची न्यायालयात आधीच चाचणी झाली आहे. आता व्यापारी त्यांच्या भांडवली खर्चाच्या हिशोबानं यावर नियोजन आणि निर्णय घेण्यास सुरुवात करू शकतात.

SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष

काय आहे 'बॅकडोअर एंट्री'चा मार्ग?

सर्वोच्च न्यायालयात अपयश आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प विविध प्राधिकरणांच्या माध्यमातून टॅरिफ लावण्याचे मार्ग शोधत आहेत. त्यांनी आणीबाणीच्या अधिकारांबाबत उच्च न्यायालयानं दिलेल्या एका निर्णयाला आपलं शस्त्र बनवलं आहे. याच्या मदतीनं ते तेच टॅरिफ पुन्हा लागू करू इच्छित आहेत. बेसेंट यांनी नमूद केलं की, इराणसोबत युद्ध सुरू असूनही अमेरिकेची अर्थव्यवस्था मजबूत आहे आणि जुलैपासून व्यापार समतोल राखण्यासाठी पुन्हा टॅरिफ लागू केले जातील.

अमेरिकन अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक पाऊल

बेसेंट यांच्या मते, यावर्षी अमेरिकेचा विकास दर ३ टक्क्यांहून अधिक राहण्याची शक्यता आहे. युद्धाच्या परिस्थितीतही मूळ महागाई दरात घट होणं हा एक चांगला संकेत आहे, विशेषतः अशा वेळी जेव्हा जगभरात तेलाच्या किमतीत असामान्य वाढ होत आहे आणि अन्नपदार्थांच्या किमती वाढत आहेत. असं असूनही अमेरिकन अर्थव्यवस्थेतील वेग कायम राहणं हे दर्शवतं की विकास दर योग्य मार्गावर आहे.

फेडरल रिझर्व्हवर निशाणा

अर्थमंत्र्यांनी अमेरिकेची मध्यवर्ती बँक 'फेडरल रिझर्व्ह'वरही निशाणा साधला. ते म्हणाले की, फेडनं महागाईबद्दल चुकीची आकडेवारी दिली आहे, कारण प्रत्यक्षात कोर इन्फ्लेशन खाली येत आहे. फेडला वाटतं की आकडेवारी स्पष्ट होईपर्यंत प्रतीक्षा करावी, परंतु तसं झाल्यास त्यांना व्याजदरात अधिक कपात करावी लागेल. मार्चचा अहवाल स्पष्ट करतो की महागाई कमी होत आहे आणि ग्राहकांवरील किमतींचा बोजाही कमी होत आहे, कारण इंधन दरवाढीचा परिणाम ग्राहकांपर्यंत पोहोचू दिला जात नाहीये, असंही ते म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Global Tension Rises Again From July; Impact on India, US Signals

Web Summary : Trump's tariffs may return in July, impacting global trade and India if no US deal is made. Using 'Section 301,' Trump administration aims to bypass court setbacks, leveraging emergency powers amid Iran tensions, with the US economy remaining strong despite global inflation.
टॅग्स :अमेरिकाडोनाल्ड ट्रम्पटॅरिफ युद्ध