शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 08:23 IST

Iran War News: अमेरिकेने इराणविरुद्ध मोठी लष्करी कारवाई सुरू करत ‘समुद्री नाकेबंदी’ केली आहे. इराणची आर्थिक नाडी मानला जाणारा तेल व्यापार आणि आयात-निर्यात पूर्णपणे रोखण्यासाठी अमेरिकेने १० हजारांहून अधिक नौसैनिक आणि हवाई दलाचे जवान तैनात केले आहेत.

तेहरान - अमेरिकेने इराणविरुद्ध मोठी लष्करी कारवाई सुरू करत ‘समुद्री नाकेबंदी’ केली आहे. इराणची आर्थिक नाडी मानला जाणारा तेल व्यापार आणि आयात-निर्यात पूर्णपणे रोखण्यासाठी अमेरिकेने १० हजारांहून अधिक नौसैनिक आणि हवाई दलाचे जवान तैनात केले आहेत. या कारवाईमुळे इराणची सागरी दळणवळण यंत्रणा कोलमडली असून, तणाव वाढला आहे.

अमेरिकन सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, नाकेबंदी लागू झाल्याच्या पहिल्या २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे जाऊ शकले नाही. अमेरिकन नौदलाच्या इशाऱ्यानंतर ६ मालवाहू जहाजांनी आपला मार्ग बदलला आणि ओमानच्या आखातातून पुन्हा इराणच्या बंदरांकडे माघार घेतली. अमेरिकेच्या एक डझनहून अधिक युद्धनौका समुद्रात सज्ज असून, शंभराहून अधिक लढाऊ आणि पाहणी विमाने आकाशात गस्त घालत आहेत. या निर्णयाने आधीच कमकुवतयुद्धबंदी धोक्यात येईल, असा इशारा चीनने दिला.

मोदी-ट्रम्प दरम्यान पुन्हा द्विपक्षीय संबंधांवर चर्चा : भारत-अमेरिकेदरम्यान लवकरच ऊर्जा क्षेत्रासह विविध क्षेत्रात काही मोठे करार होत असून त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून सुमारे ४० मिनिटे चर्चा झाली. यात होर्मुझचा विषयही चर्चेत आला. चर्चेच्या अखेरीस ट्रम्प यांनी मोदींना, आम्हा सर्वांना तुमच्याबद्दल खूप आदर आणि प्रेम असल्याचे सांगितले. 

चर्चेची दुसरी फेरी : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चेची दुसरी फेरी आगामी 'दोन दिवसांत' पार पडू शकते असे विधान केले आहे. त्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानच या फेरीचे यजमानपद भूषवण्याची शक्यता वर्तवली आहे. संरक्षण करार स्थगित : इटलीने इस्रायलशी असलेला संरक्षण करार स्थगित केला. आम्ही ज्या परिस्थितीतून जात आहोत, ती पाहता हा निर्णय घेणे आवश्यक आहे, असे इटलीच्या पंतप्रधान जाॅर्जिया मेलाेनी म्हणाल्या. 

English
हिंदी सारांश
Web Title : US Tightens Grip on Iran: 10,000 Troops Deployed, Trade Blocked

Web Summary : The US has initiated a naval blockade against Iran, deploying 10,000 troops to halt oil trade. Iranian shipping is disrupted as US warships patrol, forcing ships to reroute. Discussions between Modi and Trump included the Hormuz issue, while potential US-Iran talks are hinted at.
टॅग्स :IranइराणWarयुद्धUnited Statesअमेरिका