शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 07:48 IST

Lok Sabha News: केंद्र सरकारने लोकसभेची सदस्यसंख्या सध्याच्या ५४३ वरून थेट ८५० पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. ‘संविधान (१३१ वी सुधारणा) विधेयक, २०२६’द्वारे हा बदल सुचवण्यात आला असून, महिला आरक्षण कायद्याची अंमलबजावणी करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.  

नवी दिल्ली - केंद्र सरकारने लोकसभेची सदस्यसंख्या सध्याच्या ५४३ वरून थेट ८५० पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. ‘संविधान (१३१ वी सुधारणा) विधेयक, २०२६’द्वारे हा बदल सुचवण्यात आला असून, महिला आरक्षण कायद्याची अंमलबजावणी करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. 

महिला आरक्षण कायदा २०२३ (नारी शक्ती वंदन कायदा) च्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी, केंद्र सरकार गुरुवारी लोकसभेत एक घटनादुरुस्ती विधेयक, परिसीमन कायद्याशी संबंधित एक विधेयक, आणि दिल्ली, जम्मू आणि काश्मीर व पुद्दुचेरी (विधानसभा असलेले तीन केंद्रशासित प्रदेश) यांच्यासाठी एक विधेयक सादर करणार आहे.

या प्रस्तावामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दक्षिण भारतातील राज्यांनी यावर चिंता व्यक्त केली असून लोकसंख्या नियंत्रणात आघाडीवर असलेल्या राज्यांचे प्रतिनिधित्व कमी होऊ नये, अशी मागणी  केली आहे.  उत्तर भारतातील राज्यांमध्ये जागांची संख्या लक्षणीयरीत्या वाढण्याची चिन्हे आहेत.

काय म्हटले आहे मसुद्यात?लोकसभा, राज्यांच्या विधानसभा, दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेश, केंद्रशासित प्रदेशांत महिलांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींच्या महिलांसह) एक तृतीयांश आरक्षण देणे हा विधेयकाचा उद्देश आहे. आरक्षण नवीनतम लोकसंख्येच्या आकडेवारीवर आधारित लागू केले जाईल. यावर चर्चेसाठी १६ आणि १७ एप्रिल २०२६ रोजी विशेष अधिवेशन बोलावले आहे.

कधीपासून अंमलबजावणी? : हे नवीन बदल २०२९ च्या लोकसभा निवडणुकांपासून लागू होण्याची दाट शक्यता आहे.मतदारसंघ पुनर्रचना कशी होईल? : २०११ च्या जनगणनेच्या आधारे मतदारसंघांची पुनर्रचना करण्याचा सरकारचा मानस आहे, ज्यामुळे जागांच्या संख्येत मोठी वाढ होईल.

महिलांसाठी किती जागा?या निर्णयामुळे महिलांना लोकसभेत (सुमारे २७३ जागा) आरक्षण देणे तांत्रिकदृष्ट्या सोपे होईल. 

२०३४ नाही, २०२९ पासूनच महिला आरक्षण : पंतप्रधान २०२९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महिला आरक्षणासह पार पडल्यास भारतीय लोकशाही अधिक सशक्त आणि चैतन्यमय होईल. २०२७ च्या जनगणनेनंतरच्या सीमांकन प्रक्रियेमुळे महिला आरक्षण २०३४ पूर्वी लागू होऊ शकले नसते. मात्र, २०२९ च्या निवडणुकांपासूनच याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार कायद्यात दुरुस्ती करीत आहे.नरेंद्र मोदी, पंतप्रधान

English
हिंदी सारांश
Web Title : Lok Sabha seats may increase to 850 for women's quota.

Web Summary : The government proposes increasing Lok Sabha seats to 850 to implement women's reservation. A constitutional amendment is planned, aiming for implementation by the 2029 elections. This move sparks debate, especially regarding representation from southern states and redrawing constituencies based on the 2011 census.
टॅग्स :lok sabhaलोकसभाParliamentसंसदCentral Governmentकेंद्र सरकार