रायगंज (पश्चिम बंगाल) - राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यावर प्रत्येक कुटुंबाला १० लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य विम्याचा लाभ देण्यात येईल असे आश्वासन काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी दिले.
पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात जाहीर सभेत ते बोलत होते. राहुल गांधी म्हणाले, पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने राज्यातील जनतेला नुसतीच नोकरी व रोजगाराची आश्वासने दिली. ५ लाख लोकांना रोजगार देण्याच्या गप्पा केल्या. मात्र, कुणालाही रोजगार मिळू शकला नाही. राज्यात ८४ लाख तरुणांनी बेरोजगारी भत्त्यासाठी अर्ज केले असल्याचा दावाही त्यांनी केला.
वगळलेली नावे पुन्हा नोंदवूप. बंगालमध्ये मतदार याद्यांतून चुकीच्या निकषांआधारे वगळण्यात आलेली मतदारांची नावे काँग्रेस सरकार राज्यात सत्तेत आल्यावर पुन्हा या याद्यांत समाविष्ट केली जातील, असे आश्वासन राहुल यांनी मालदा येथे आयोजित जाहीर दिले.
राहुल गांधींनी जाहीर केलेल्या घोषणा राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यावर प्रत्येक कुटुंबाला १० लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य विम्याचा लाभ.जिल्हा रुग्णालयांमध्ये कॅन्सर आणि डायलिसिससारखे उपचार मोफत केले जातील.शेतकऱ्यांना मोफत वीज, विद्यार्थ्यांना पदवीपर्यंत तर महिलांना उच्चशिक्षणापर्यंत आर्थिक मदत देण्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले.
Web Summary : Rahul Gandhi pledged ₹10 lakh health insurance per family in West Bengal if Congress forms the government. He criticized the current government's unfulfilled job promises and vowed to reinstate wrongly removed voters and provide free healthcare and education.
Web Summary : राहुल गांधी ने पश्चिम बंगाल में कांग्रेस सरकार बनने पर हर परिवार को ₹10 लाख का स्वास्थ्य बीमा देने का वादा किया। उन्होंने वर्तमान सरकार के नौकरी के झूठे वादों की आलोचना की और गलत तरीके से हटाए गए मतदाताओं को बहाल करने और मुफ्त स्वास्थ्य सेवा और शिक्षा प्रदान करने का संकल्प लिया।