Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका

Ajinkya Rahane fined, CSK vs KKR IPL 2026: कोलकाताने यंदाच्या हंगामात ५ सामन्यांपैकी एकही सामना जिंकलेला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 10:01 IST

Open in App

Ajinkya Rahane fined, CSK vs KKR IPL 2026: कोलकाता नाइट रायडर्स संघाची यंदाच्या हंगामाची सुरुवात अतिशय खराब झाली आहे. सुरुवातीच्या ५ पैकी ४ सामन्यात त्यांचा पराभव झाला तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. मंगळवारी झालेल्या सामन्यात चेन्नईच्या संघाने कोलकाताचा पराभव केला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १९२ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलताताच्या संघाला १६० धावाच करता आल्या. सातत्याने पराभवाचा सामना करावा लागत असल्याने कोलकाता संघावर टीकेचा वर्षाव होत आहे. पण त्यासोबत कर्णधार अजिंक्य रहाणे यालाही BCCI ने मोठा दणका दिला आहे.

१२ लाखांचा दंड

सलग पराभवांच्या मालिकेनंतर संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे याला 'स्लो ओव्हर रेट' (विहित वेळेत षटके पूर्ण न करणे) राखल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या आचारसंहितेनुसार, किमान ओव्हर रेटचे उल्लंघन केल्याबद्दल रहाणेला १२ लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. केकेआरचा या हंगामातील हा पहिलाच असा गुन्हा असल्याने ही रक्कम केवळ कर्णधाराला लागू झाली आहे. जर दुसऱ्यांदा हा गुन्हा घडला तर रहाणेच्या दंडाची रक्कम दुप्पट केली जाईल. त्यासोबतच संघातील इतर खेळाडूंनाही दंड ठोठवला जाऊ शकेल.

केकेआरच्या फॉर्मची साऱ्यांनाच चिंता

या दंडापेक्षा मोठी चिंता केकेआरसाठी त्यांचा फॉर्म आहे. यंदाच्या हंगामात केकेआरला अद्याप एकाही विजयाची चव चाखता आलेली नाही. रहाणेकडे नेतृत्व सोपवल्यापासून संघाची कामगिरी खालावलेली दिसत आहे. केवळ नेतृत्वच नाही, तर रहाणेला वैयक्तिक स्तरावरही फलंदाजीत मोठी खेळी करता आलेली नाही. मध्यक्रमात अनुभवी खेळाडू म्हणून त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत.

केकेआरची पुढील आव्हाने

केकेआरच्या चाहत्यांसाठी दंडाची बातमी दुहेरी धक्का देणारी आहे. संघ गुणतालिकेत सर्वात खाली असून, आता कर्णधारावर झालेल्या या कारवाईमुळे संघाच्या मनोबलावर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

English
हिंदी सारांश
Web Title : KKR's Woes Deepen: Rahane Fined Amidst IPL 2026 Struggles

Web Summary : KKR faces mounting pressure after consecutive losses. Captain Rahane is fined ₹12 lakh for slow over-rate. The team's poor performance and Rahane's batting struggles add to KKR's worries, impacting team morale and playoff chances this season.
टॅग्स :आयपीएल २०२६अजिंक्य रहाणेकोलकाता नाईट रायडर्सबीसीसीआयचेन्नई सुपर किंग्स