शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या कारने चार वर्षांच्या बालिकेला उडविले; प्रकृती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 22:23 IST

शिरूरला प्रचारासाठी जात असताना घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर : शिरूर नगर परिषदेच्या प्रचारासाठी पुण्याकडून शिरूरकडे निघालेल्या आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या भरधाव कारने ४ वर्षीय बालिकेला जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी (दि. ३०) दुपारी शिरूरच्या बोऱ्हाडेमळा येथे पुणे-अहिल्यानगर महामार्गावर घडली. यातील जखमी बालिकेची प्रकृती गंभीर आहे. शुभ्रा पंढरीनाथ बोऱ्हाडे (वय ४) असे या अपघातात गंभीर झखमी झालेल्या बालिकेचे नाव आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार ज्ञानेश्वर कटके हे वाघोली येथून शिरूर नगरपरिषदेच्या प्रचारासाठी रविवारी दुपारी शिरूर येथे येत होते. बोऱ्हाडे मळा येथील हुंदाई शोरूम समोर शुभ्रा बोऱ्हाडे ही चार वर्षीय बालिका महामार्ग ओलांडत होती. एका कारच्या आडून ती अचानक आमदार कटके यांच्या काळ्या रंगाच्या मर्सिडीज कार समोर आली. कटके यांच्या चालकाने जोरदार ब्रेक दाबला परंतु गाडीच्या वेगामुळे शुभ्राला समोरासमोर जोराची धडक बसली. यात ती चेंडूसारखी उडून काही फुट अंतरावर डांबरी रस्त्यावर पडली. यात तिला गंभीर मार लागला असून, दात पडून जबड्याला जबर जखम झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. गाडीची धडक बसताच नागरिकांनी घटनासथळाकडे धाव घेतली. आमदार कटके व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कारमधून खाली धाव घेत शुभ्रा हिला मदत करत उचलले. कटके यांनी दुसऱ्या कारमधून शिरूर गाठले तर त्यांच्याच कारमधून शुभ्रा हिला तातडीने शिरूरच्या वात्सल्य हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या ठिकाणी तिच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले.

दरम्यान शिरूर नगरपरिषदेचा प्रचार शिगेला पोहचला आहे. शिरूरची निवडणूक आजी-माजी आमदारांनी प्रतिष्ठेची केली आहे. प्रचाराला वेळेत पोहचण्यासाठी नेते मंडळींची एकच धावपळ उडाली आहे. आज शिरूर येथे प्रचारातील पदयात्रेला पोहचण्यासाठी आमदार कटके वाघोली येथून शिरूरला भरधाव चालले असताना हा अपघात घडला आहे. पुढऱ्यांची हीच धावपळ शुभ्रा सारख्या सर्वसामान्य बालिकेच्या जीवावर बेतल्याची चर्चा शिरूर शहर व तालुक्यात रंगली आहे.

पोलिस प्रशासनाची लपवाछपवी

आमदार कटके यांच्याच कारने चार वर्षीय बालिकेला उडवल्याची माहिती हा हा म्हणता संपूर्ण शिरूर शहरात पसरली मात्र या घटनेबाबत आमच्यापर्यंत ना रुग्णाल्याकडून खबर आली, ना तक्रार करण्यासाठी कोणी आले. यामुळे या घटनेबाबत आम्हाला काहीच माहिती नसल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. ही लपवाछपवी कशासाठी केली जात होती? की आमदारांकडून पोलिसांवर दबाव टाकण्यात आला होता अशी चर्चा शिरूर शहरात सुरू होती.

English
हिंदी सारांश
Web Title : NCP MLA's car hits four-year-old girl; condition critical.

Web Summary : An NCP MLA's speeding car hit a four-year-old girl in Shirur. Critically injured, she was rushed to a Pune hospital. The incident occurred during the MLA's campaign travel, sparking public concern and allegations of a police cover-up.
टॅग्स :Local Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसAccidentअपघात