शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
3
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
4
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
5
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
6
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
7
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
8
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
9
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

'मी राज ठाकरेंचे आभार मानतो'; महाराष्ट्रात येण्याआधी ब्रिजभूषण सिंह नेमकं काय म्हणाले, पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 16:23 IST

खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याला भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी प्रखर विरोध केला होता. त्यामुळे राज ठाकरे यांना अखेर आपला अयोध्या दौरा रद्द करावा लागला होता. मात्र आता तेच ब्रिजभूषण सिंह येत्या काही दिवसात पुणे शहरात येणार आहेत. महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या निमित्ताने ते पुण्यात येणार आहेत. यावेळी सर्वांचे लक्ष हे मनसेच्या भूमिकेकडे होते. मात्र मनसे ब्रिजभूषण सिंह यांना कोणताही विरोध करणार नाही, असं पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांनी सांगितले. 

राजकारणात कुणीही शत्रू नसतो, त्याप्रमाणे कुस्तीचे नियम देखील तसेच आहेत. पराभव झाल्यानंतर सुद्धा कुस्तीतले पैलवान एकमेकांची गळाभेट घेत असतात. ही महाराष्ट्राची संस्कृती असल्यामुळे त्याप्रमाणेच ब्रिजभूषण सिंह यांचे आम्ही स्वागत करु, असं वसंत मोरे म्हणाले. तसेच ब्रिजभूषण सिंग यांनी देखील राज ठाकरे हे माझे वैयक्तिक शत्रू नाहीत, असं एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं. 

ब्रिजभूषण सिंह म्हणाले की, मनसे मला विरोध करणार नाही, ही चांगली गोष्ट आहे. यासाठी मी राज ठाकरेंचे आभार मानतो. राज ठाकरेंना मी नैतिकरित्या विरोध केला होता. राज ठाकरेंना मी फक्त माफी मागा, असं म्हटलं होतं. तसेच त्यांच्या जागी मी असतो आणि माझ्याकडून काही चूक झाली असती, तर मी नक्कीच माफी मागितली असती, असं ब्रिजभूषण सिंह यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील पैलवान यांच्यासोबत कोणताही भेदभाव करत नाही. मी महाराष्ट्रातील पैलवानांवर माझं प्रेम आहे, असंही ब्रिजभूषण सिंह यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, प्रकृतीच्या कारणामुळे राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर गेले नव्हते. यामध्ये इतर कुठलाही विषय नव्हता. राज ठाकरे जरी अयोध्येला गेले नव्हते तरी मनसैनिकांनी आयोजित जाऊन दर्शन घेतलं होते. त्यामुळे महाराष्ट्र सैनिकाची ताकद किती आहे हे संपूर्ण देशाला माहित आहे. अन्यथा आमच्याही अंगाला लाल माती लागली आहे. कुस्ती कशी खेळायची याविषयी देखील आम्हाला चांगलेच माहित आहे. मात्र राज ठाकरे यांचा आदेश असल्यामुळे ब्रिजभूषण सिंग यांना मनसे विरोध करणार नाही, असेही वसंत मोरे म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेBJPभाजपाPuneपुणे