राज्यभरात चोरीचे शंभरहून अधिक गुन्हे दाखल; पुण्यातून चोरटा अखेर गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 12:16 IST2026-05-18T12:15:41+5:302026-05-18T12:16:30+5:30

पुणे जिल्हा, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पिंपरी-चिंचवड शहर परिसरात या चोरट्याने गुन्हे केले आहेत

More than a hundred theft cases registered across the state; Thief from Pune finally arrested | राज्यभरात चोरीचे शंभरहून अधिक गुन्हे दाखल; पुण्यातून चोरटा अखेर गजाआड

राज्यभरात चोरीचे शंभरहून अधिक गुन्हे दाखल; पुण्यातून चोरटा अखेर गजाआड

पुणे : शहरासह राज्यभरात चोरीचे शंभरहून जास्त गुन्हे दाखल असलेल्या सराईताला अलंकार पोलिसांनी अटक केली. चोरट्याने कारच्या काचा फोडून ऐवज चोरल्याचे उघड झाले असून, त्याच्याकडून १२ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राजू बाबूराव जावळकर (वय ५७, रा. डोणजे फाटा, सिंहगड रोड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

एरंडवणे, कोथरूड परिसरात कारच्या काचा फोडून ऐवज चोरून नेण्याच्या घटना वाढल्या होत्या. चोरट्यांनी रोख रकमेसह दागिने, इलेक्ट्राॅनिक्स वस्तू चोरल्या होत्या. याप्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. अलंकार पोलिसांनी तपास सुरू केला. एरंडवणे, कोथरूड भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी जावळकरला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सोन्याचे दागिने, लॅपटाॅप, दोन मोबाइल, रोख रक्कम आणि दुचाकी, असा १२ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जावळकरने पुणे शहर, जिल्हा, तसेच कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पिंपरी-चिंचवड शहर परिसरात गुन्हे केले आहेत. त्याच्याविरोधात चोरीचे शंभरहून जास्त गुन्हे दाखल झाले आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक उल्हास कदम, पोलिस निरीक्षक स्मिता पाटील, उपनिरीक्षक गणेश दीक्षित, महेश निंबाळकर, धीरज पवार, सोमेश्वर यादव, माधुरी कुंभार, राकेश क्षीरसागर, शिवाजी शिंदे, आशिष राठोड, विशाल मोरे यांनी ही कारवाई केली.

Web Title : पुणे में सौ से अधिक मामलों वाला कुख्यात चोर गिरफ्तार

Web Summary : महाराष्ट्र में 100 से अधिक मामलों वाले एक सीरियल चोर, राजू जावलकर को पुणे पुलिस ने गिरफ्तार किया। उसने खिड़कियां तोड़कर कारों से कीमती सामान चुराया। पुलिस ने सोने, लैपटॉप और नकदी सहित 12.18 लाख रुपये का चोरी का सामान बरामद किया।

Web Title : Notorious Thief with Over 100 Cases Arrested in Pune

Web Summary : Pune police arrested a serial thief, Raju Jawalkar, with over 100 cases across Maharashtra. He stole valuables from cars by breaking windows. Police recovered stolen goods worth ₹12.18 lakh, including gold, laptops, and cash.