शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

थोरल्या बाजीरावांचे स्मारक दख्खनी शैलीत मध्य प्रदेशमध्ये साकारणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 10:03 IST

अखेरपर्यत अजिंक्य राहिलेल्या बाजीरावांनी आपला देह मध्य प्रदेशात रावेरखेडला ठेवला. राजा छत्रसाल यांच्या मदतीला बुंदेलखंडात धाव घेऊन निर्माण केलेले नाते बाजीरावांनी असे घट्ट केले. त्याची जाण ठेवत मध्य प्रदेश सरकारने रावेरखेडला १०० कोटी रुपयांचा बाजीराव समाधी जीर्णोद्धार प्रकल्प जाहीर केला. 

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मध्य प्रदेशात नर्मदातिरी रावेरखेडी येथे होणारे थोरल्या बाजीरावांचे स्मारक मराठा स्थापत्यशैलीत व्हावे, ही मराठी इतिहासकारांची मागणी मध्य प्रदेश सरकारने मान्य केली. केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांनी तशा सूचना जाहीर कार्यक्रमातच मध्य प्रदेश सांस्कृतिक विभागाला दिल्या.

अखेरपर्यत अजिंक्य राहिलेल्या बाजीरावांनी आपला देह मध्य प्रदेशात रावेरखेडला ठेवला. राजा छत्रसाल यांच्या मदतीला बुंदेलखंडात धाव घेऊन निर्माण केलेले नाते बाजीरावांनी असे घट्ट केले. त्याची जाण ठेवत मध्य प्रदेश सरकारने रावेरखेडला १०० कोटी रुपयांचा बाजीराव समाधी जीर्णोद्धार प्रकल्प जाहीर केला. 

त्याची शैली थोडी मुघलकालीन स्थापत्यशैलीतील होती.  इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी याला हरकत घेत हे स्मारक मराठा स्थापत्यशैलीत व काळ्या पाषाणात व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यानुसार मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक विभागाने लगेचच पूर्वीचा विकास आराखडा बदलून नवा तयार केला. हा आराखडा १०० कोटी रुपयांचा आहे. त्यातील २७ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन १८ ऑगस्टला बाजीरावांच्या जयंतीदिनी झाले.या स्मारकात आता काळ्या पाषाणातील शनिवारवाड्याच्या दिल्ली दरवाजाची बुरुजांसहितची प्रतिकृती असेल. बाजीराव पेशव्यांचा एक भव्य पुतळा, भव्य घाट, बाजीरावांच्या पत्नी काशीबाई यांनी बांधलेल्या शिवमंदिराचा जीर्णोद्धार, भव्य संग्रहालय, पर्यटन निवास, व्यापारी संकूल, समाधिस्थळाकडे जाण्यासाठी चौपदरी रस्ता निर्माण करण्यात येणार आहे. 

माळवा-बुंदेलखंडची जनता बाजीरावांचे ऋण कदापि विसरणार नाही, असे या वेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर, खासदार गजेंद्र चौहान, होळकर घराण्याचे वंशज यशवंतराव होळकर, बाजीराव-मस्तानीचे वंशज अवेश बहाद्दूर, पुण्यातून इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, बाजीराव स्मारक समितीचे सचिव श्रीपाद कुलकर्णी, श्रीनिवास कुलकर्णी उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेMadhya Pradeshमध्य प्रदेश