शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
4
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
5
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
6
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
7
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
8
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
9
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
10
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
11
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
12
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
13
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
15
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
16
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
17
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
18
राखीव प्रवर्गांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाला स्थगिती, मंत्रिमंडळाचा निर्णय : महाधिवक्त्यांचे मत घेणार
19
जगातील टॉप-१०० मधून भारतीय कंपन्या हद्दपार; रिलायन्सही या स्थानावर घसरली...
20
मंदिरांमधील सोने सरकार विकणार आहे ? चर्चा आणि अफवांना सरकारने दिला पूर्णविराम 
Daily Top 2Weekly Top 5

मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला भीषण आग; एक कोटींचे साहित्य जळून खाक, शिरूर तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 17:24 IST

गोडाऊनच्या शेजारीच निवासी घरे असल्याने परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने, वेळेत पावले उचलल्यामुळे शेजारील घरांना आगीची झळ बसली नाही

शिक्रापूर :पाबळ ता. शिरूर येथील प्रसिद्ध व्यावसायिक राजेंद्र झोडगे यांच्या मंडप डेकोरेशनच्या मोठ्या गोडाऊनला अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत गोडाऊनमधील मंडप साहित्य, खुर्च्या ,आणि इतर सर्व साहित्य जळून खाक झाले असून सुमारे एक कोटी ८६ लाख  रुपयांचे नुकसान झाले आहे. 

अग्निशामक दल आणि स्थानिक प्रशासनाने तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.​ ​आग एवढी भीषण होती की, काहीच वेळात आगीच्या ज्वाळा आणि धुराचे मोठे लोट आकाशात पसरले. गोडाऊनच्या शेजारीच निवासी घरे असल्याने परिसरात प्रचंड भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने, वेळेत पावले उचलल्यामुळे शेजारील घरांना आगीची झळ बसली नाही आणि मोठा अनर्थ टळला.​ घटनेची माहिती मिळल्यानंतर खेड व पिंपरी चिंचवड भागातील अग्निशामक दलाच्या तीन गाड्या दीड तें दोन तासांनी घटनास्थळी दाखल झाल्या. त्या अगोदर स्थानिक नागरिकांनी टँकरच्या मध्यमातून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आगीचे रौद्ररूप पाहता पाण्याचे टँकर कमी पडू नये म्हणून स्थानिक टँकरचाही मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. अग्निशामक जवान आणि स्थानिक नागरिकांनी जिवाची बाजी लावत तब्बल चार तास अथक प्रयत्न केले, त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.​

या आगीत राजेंद्र झोडगे यांचे अतोनात नुकसान झाले आहे. गोडाऊनमध्ये लग्नसराई आणि इतर कार्यक्रमांसाठी लागणारे महागडे साहित्य साठवून ठेवण्यात आले होते, जे पूर्णपणे जळाले आहे. घटनेनंतर प्रशासकीय अधिकारी राहुल गवते ,म्हातारंबा चव्हाण घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Massive Fire Destroys Decoration Warehouse in Shirur; Crores Lost

Web Summary : A devastating fire engulfed a decoration warehouse in Shirur, causing extensive damage. Valued at crores, the warehouse’s contents were completely destroyed despite firefighters' four-hour effort. The cause is unknown.
टॅग्स :PuneपुणेShirurशिरुरFire Brigadeअग्निशमन दलWaterपाणीMONEYपैसाbusinessव्यवसाय