वाघोलीत कॉटमट कंपनीच्या गोडाऊनला भीषण आग; तीन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 03:33 PM2021-04-10T15:33:29+5:302021-04-10T15:45:48+5:30

गोडाऊनमधील कच्चा मालामुळे आगीने केले रौद्र रूप धारण

Kotmat Electronic Pvt. Ltd. The company's godown caught fire | वाघोलीत कॉटमट कंपनीच्या गोडाऊनला भीषण आग; तीन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण

वाघोलीत कॉटमट कंपनीच्या गोडाऊनला भीषण आग; तीन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण

Next
ठळक मुद्देगोडाऊन बंद असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यात अडचण

पुणे: पुण्यात मागील काही दिवसांपासून आगीचे सत्र सुरू असताना पुन्हा एकदा आग लागल्याची घटना वाघोली येथे घडली आहे. कॉटमट इलेक्ट्रॉनिक प्रा. लिमिटेड या कंपनीच्या गोडाऊनला आज दुपारी भीषण आग लागली. या गोडाऊनमध्ये कंट्रोल पॅनल बनवण्याचे काम केले जात असल्याने मोठ्या प्रमाणावर कच्चा मालाचे मटेरियल होते. त्यामुळे आगीने भिषण असे रौद्र रूप धारण केले होते. 

वाघोली येथील पीएमआरडीएच्या अग्नीशमन दलाला यांची माहिती मिळताच क्षणी त्यांनी घटना स्थळी धाव घेतली. आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले. कंपनीचे गोडाऊन मात्र बंद होते. त्यामुळे आग विझवण्यास अडचणी येत होत्या. त्यातून प्रचंड धुराचे लोंढे बाहेर पडत होते. अशा परिस्थितीत अग्निशमन दलाच्या जवानांनी एका बाजूने भिंत पाडून आत प्रवेश केला. त्यांच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आली.

यावेळी वाघोली अग्निशमन दलाचे  मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ,उपस्थानक अधिकारी विजय महाजन, यांनी तीन अग्निशमन वाहनांच्या मदतीने १५ जवानांच्या साह्याने ३ तास अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
 

Web Title: Kotmat Electronic Pvt. Ltd. The company's godown caught fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.