शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाची वरात पाहत असलेल्या एकावर सुरीने वार, पूर्ववैमनस्यातून जीवे मारण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 20:25 IST

हवेली तालुक्यातील सांगरुनमध्ये मध्यरात्री घडली घटना, कोरोना लॉकडाऊनमध्ये निघाली होती वरात

ठळक मुद्देनातेवाइकात जुन्या दर्ग्याचे देखभालीवरुन होते वाद, जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या पोटात व पाठीत सुर्‍याने भोसकून गंभीर जखमी केले

पुणे: पूर्ववैमनस्यातून लग्नाची वरात पाहत असलेल्या एकावर सुर्‍याने भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

रफिक इब्राहिम पानसरे (वय ५०, रा. सांगरुन, ता. हवेली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ही घटना १२ जून रोजी मध्यरात्री सव्वा बारा वाजता सांगरुन गावात घडली. याप्रकरणी साहिल पानसरे (वय २१, रा. सांगरुन, ता़ हवेली) यांनी उत्तमनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल याचे वडिल सादिक पानसरे व रफिक पानसरे हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. सादिक आणि रफिक यांचे जुन्या दर्ग्याच्या देखभालीवरुन वाद आहेत. तसेच साहिल यांच्या बहिणीला दोन वर्षांपूर्वी रफिकने शिवीगाळ केली होती. यावरुन त्यांच्यात वाद होता.

सांगरुन गावात १२ जून रोजी मध्यरात्री लग्नाची वरात सुरु होती. सर्व जण तेथे थांबून वरात बघत होते. यावेळी रफिक हा हातात सुरा घेऊन आला. त्याने सादिक याला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या पोटात व पाठीत सुर्‍याने भोसकले. त्याला गंभीर जखमी केले. उत्तमनगर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून रफिक पानसरे याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारीKhedखेड