शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

वर्गात अडकलेल्या चिमुरडीची सुटका

By admin | Updated: September 26, 2015 02:39 IST

शाळा सुटल्यानंतर घाईघाईने वर्गशिक्षिकेने वर्गाला कुलूप लावल्याने पहिलीतील एक विद्यार्र्थिनी आत अडकली. गावातील एका युवतीच्या

केडगाव : शाळा सुटल्यानंतर घाईघाईने वर्गशिक्षिकेने वर्गाला कुलूप लावल्याने पहिलीतील एक विद्यार्र्थिनी आत अडकली. गावातील एका युवतीच्या व ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे तिला सुखरूप बाहेर काढण्यात आले. ही घटना दौंड तालुक्यातील खुटबाव येथे आज (दि. २५) घडली. जान्हवी संतोष तोरणे (वय ६) असे या चिमुरडीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, की येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेहमीप्रमाणे सायंकाळी ५ वाजता सुटली. सर्व विद्यार्थी वर्गाबाहेर गेले. मात्र, जान्हवी वर्गातच अडकली. वर्गशिक्षिकेने पाहणी न करताच कुलूप लावल्याने ती वर्गात अडकली. सायंकाळी ६च्या दरम्यान शाळेशेजारून एक युवती जात असताना तिला वर्गामध्ये रडण्याचा आवाज आला. सदर युवतीने प्रसंगावधान राखून तातडीने ग्रामस्थांशी संपर्क केला. त्यानंतर खुटबावचे सरपंच शिवाजी थोरात, कोंडिबा थोरात, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष शरद शेलार, नाना थोरात घटनास्थळी आले. तोपर्यंत या विद्यार्थिनीच्या वर्गशिक्षिका घाईघाईने पुण्याकडे रवाना झाल्या होत्या. या शाळेतील गावात राहणाऱ्या एका उपशिक्षिकेने घाईघाईने दुसरी चावी मिळवली व एक तासाच्या अवधीनंतर जान्हवीला बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले. विषेश म्हणजे शुक्रवारी बकरी ईदची शाळेला सुट्टी होती. केवळ नशीब बलवत्तर म्हणून जान्हवी सुखरूप व अल्पवेळेत आई-वडिलांना मिळाली. सायंकाळी ५ वाजता जान्हवी पहिलीच्या वर्गात झोपली असल्याने वर्गशिक्षिकेने वर्ग तपासणी न करताच वर्गाला कुलूप लावल्याने ही घटना घडली. (वार्ताहर)