शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

खेड तालुक्यातील ‘सेझ’चा पेच सुटणार!

By admin | Updated: September 24, 2015 02:58 IST

खेड येथील सेझ अंतर्गत स्थापन करण्यात आलेली ‘केडीएल’ म्हणजेच खेड डेव्हलपर्स लिमिटेड ही कंपनी गुंडाळण्याची सेझबाधित शेतकऱ्यांची मागणी अखेर कंपनी प्रशासनाने

राजगुरूनगर : खेड येथील सेझ अंतर्गत स्थापन करण्यात आलेली ‘केडीएल’ म्हणजेच खेड डेव्हलपर्स लिमिटेड ही कंपनी गुंडाळण्याची सेझबाधित शेतकऱ्यांची मागणी अखेर कंपनी प्रशासनाने प्राथमिक स्तरावर आजच्या कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मान्य केली आहे. त्यामुळे सेझबाधितांच्या प्रदीर्घ लढ्यास यश मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. ज्या शेतकऱ्यांना ‘केडीएल’ कंपनीतून विभागणी करून बाहेर पडावयाचे असेल त्यांना सहकार्य करावे, असा ठराव जोपर्यंत कंपनी करीत नाही, तोपर्यंत ‘केडीईल’ची वार्षिक सभा होऊ देणार नाही, अशी भूमिका सेझबाधित शेतकऱ्यांनी घेतली होती. त्याप्रमाणे ही सभा आज पुणे येथील अल्पबचत भवन येथे सुरूहोताच शेतकऱ्यांनी निर्णय घेतल्याशिवाय इतर कामकाज होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. सभेस शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजच्या सभेत इतर कोणतेच कामकाज होऊ न देता कंपनी गुंडाळण्याकरीता त्वरित कारवाई सुरू करावी, अशी एकमुखी मागणी सभासदांद्वारे करण्यात आली. शेवटी कंपनी व्यवस्थापनाने यास अनुकुलता दर्शवीत लवकरच याकरीता ४५ दिवसांनी विशेष सभा घेण्याचे आश्वासन दिले. तसेच त्यावेळी शेतकरी सभासदांच्या मागणीप्रमाणे १५ टक्के विकसित जमिनीचा परतावा त्यांना देण्याबाबत सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे ‘केडीएल’ गुंडाळण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याचे मानण्यात येत आहे. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने अ‍ॅड. योगेश पांडे, राजेंद्र्र ढवाण पाटील, बापू करंडे, अभिनंदन बसणवार उपस्थित होते. ‘केडीएल’चे सर्व संचालक, एमआयडीसीचे अधिकारी अजित रेळेकर हेही उपस्थित होते. गेल्यावर्षी २३ सप्टेंबर रोजीची वार्षिक सर्वसाधारण सभा उधळून लावली होती. ती सभा २० डिसेंबर रोजी पुन्हा कंपनीकडून आयोजित केली होती. तीही उधळून लावून शेतकऱ्यांनी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या झेंड्याखाली अल्पबचत भवनाच्या फाटकावर आंदोलन केले होते. त्यामुळे आजची सभाही होऊ देणार नाही, अशी शेतकऱ्यांची भूमिका होती. (वार्ताहर)