शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

दर वाढवल्याने ओसरली फलाटावरची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने फलाटावरचे प्रवेश शुल्क वाढवले. त्यामुळे अनावश्यक गर्दी कमी झाली, पण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने फलाटावरचे प्रवेश शुल्क वाढवले. त्यामुळे अनावश्यक गर्दी कमी झाली, पण प्रशासनाचे उत्पन्न घटले व फलाटावरच फुकट मुक्काम ठोकणाऱ्यांना आता त्यासाठी पैसे मोजावे लागत आहे.

कोरोनामुळे रेल्वेलाही त्याचा फटका बसला आहे. नुकत्याच काही गाड्या सुरू झाल्या. मात्र, फक्त आरक्षण असणाऱ्या प्रवाशांनाच सध्या सगळ्याच फलाटांवर प्रवेश दिला जातो. इतरांंना फलाटावर येण्यास मनाईच आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी होऊन पुढील आदेश येईपर्यंत ही बंदी कायम आहे.

महिला, वृद्ध, दिव्यांग यांना स्थानकात सोडण्यासाठी, गाडीत बसवून देण्यासाठी म्हणून कोणी मदतनीस आवश्यक असतो. अशानांच फक्त ५० रूपये देऊन फलाट तिकीट घेता येते व फलाटावर जाता येते. त्यांचा फलाटावरचा वावर त्यांची नियोजित गाडी सुटेपर्यंतच (कमाल २ तास) गृहीत धरला आहे. त्यामुळे फलाटावर फुकटचा मुक्काम ठोकणारे एकदम कमी झाले आहेत.

पुण्यातील लोकल सुरू केल्यात, पुणे लोणावळा दरम्यान दिवसभरात चार फेऱ्या होतात. त्यातही पोलिस आयुक्त कार्यालयाकडून अत्यावश्यक सेवेसाठी असे स्वाक्षरी व क्यूआरकोड प्रवेशपत्र असल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे या गाड्यांमधूनही फक्त गरज असलेले प्रवासीच प्रवास करतात.

पुण्यात २४ तासांमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांची संख्या १३० च्या दरम्यान आहे. दररोजच्या प्रवाशांची पुणे विभागातील संख्या २५ ते ३० हजारांच्या आसपास आहे. त्यातले सर्वाधिक पुणे शहरातून म्हणजे पुण्यातील स्थानकांमधून प्रवास करणारेच जास्त आहेत.