'आरोपी आजोबाला मी घरातून हाकलून दिला होता', पर्वती घटनेतील मुलीच्या वडिलांची दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 15:46 IST2026-05-06T15:45:08+5:302026-05-06T15:46:50+5:30

पर्वतीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

'I had thrown the accused grandfather out of the house', reveals the father of the girl in the Parvati incident | 'आरोपी आजोबाला मी घरातून हाकलून दिला होता', पर्वती घटनेतील मुलीच्या वडिलांची दिली माहिती

'आरोपी आजोबाला मी घरातून हाकलून दिला होता', पर्वती घटनेतील मुलीच्या वडिलांची दिली माहिती

पुणे : पुण्यातील पर्वती भागात झालेल्या अत्याचाराच्या घटनेत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. त्या आजोबाला मी हाकलून दिल्याचे मुलीच्या वडिलांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. आरोपी आजोबाने एक वर्षांपूर्वी माझा मोबाईल चोरला होता. त्यानंतर मी त्याला हाकलून दिले होते. त्याने याआधीही अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर बायकोला मी थेट असं बोललो होतो कि, नवरा पाहिजे कि बाप. तेव्हा बायकोने माझ्यासोबत राहायचे असे सांगून त्याला घरातून हाकलून दिले. 

नसरापूरची संतापजनक घटना ताजी असतानाच पुणे शहरातील पर्वती पायथा परिसरातील जय भवानी नगर येथे ही धक्कादायक घटना उघडकीस आली.  एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच आजोबांकडून गैरकृत्य करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. घटना घडत असताना परिसरातील नागरिकांच्या वेळीच लक्षात आल्यामुळे त्यांनी तातडीने हस्तक्षेप करत आरोपीला पकडले आणि संतप्त जमावाने त्याला चोप दिला. या प्रकारानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.आरोपीचे नाव अंबादास यलम्मा जाधव (वय अंदाजे 62 वर्षे, रा. जय भवानी नगर) असे आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. 

आरोपी आजोबाला फाशी द्या 

मुलीच्या वडिलांचा मोबाईल चोरल्यानंतर त्यांनी या आजोबाला घरातून हाकलून दिले होते. त्याने याआधी सुद्धा असा अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती वडिलांनी दिली. माझ्या बायकोने त्याला हाकलूनही दिले होते. तो कधी येऊन पुन्हा राहायला लागला. हे आम्हाला माहित नसल्याचे वडिलांनी सांगितले. आता या आजोबाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी मुलीच्या वडिलांनी केली आहे.  

Web Title : पार्वती घटना: पिता ने बताया, आरोपी दादा को घर से निकाला था।

Web Summary : पुणे: पार्वती में, एक व्यक्ति ने खुलासा किया कि उसने अपने ससुर को, जो अब अपनी बेटी पर हमला करने के आरोपी हैं, चोरी और पहले के दुर्व्यवहार के प्रयासों के बाद निकाल दिया था। उसने कठोरतम सजा की मांग की।

Web Title : Parvati Incident: Father Reveals He Had Expelled Accused Grandfather.

Web Summary : Pune: In Parvati, a man revealed he'd evicted his father-in-law, now accused of assaulting his daughter, after a theft and prior abuse attempts. He demands the harshest punishment.