अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 17:46 IST2026-05-06T17:45:05+5:302026-05-06T17:46:33+5:30

Deputy CM Sunetra Ajit Pawar News: ४९ तास ४१ मिनिटे ०४ सेकंद असा अखंड पोहण्याचा पराक्रम आर्यनसिंह दडियाला याने केला.

salute to late ajit pawar work 210 km swimming record swimmer aryan singh meets deputy cm sunetra pawar | अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट

अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट

Deputy CM Sunetra Ajit Pawar News:  'कामाचा माणूस' म्हणून प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांना समर्पित म्हणून आर्यनसिंह दडियाला या युवकाने २१० किलोमीटरचा महाराष्ट्र सीमेजवळील क्वेरीम बीच ते कर्नाटक सीमेजवळील पोलेम बीच असा खुल्या समुद्रातील दोन-मार्गी (टू-वे) एकल (सोलो) मॅरेथॉन पोहण्याचा ऐतिहासिक विक्रम केला आहे. दरम्यान यासंदर्भात आर्यनने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची देवगिरी येथे भेट घेतली. 

४९ तास ४१ मिनिटे ०४ सेकंद असा २८ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ यादरम्यान अखंड पोहण्याचा पराक्रम आर्यनसिंह दडियाला याने केला. महाराष्ट्राच्या जनतेसाठी दादा नेहमीच मेहनत घेत होते.दिवसरात्र दादांनी विकासकार्याला वाहून घेतले होते त्यांच्या कार्याला सलाम म्हणून आर्यनने देशासाठी अखंड पोहण्याचा निर्धार पूर्ण केला.

काळोखी रात्र, प्रचंड वारे तरीही खंबीरपणे लक्ष्य गाठले

काळोख्या रात्री, प्रचंड वारे, पाण्याखालील प्रवाह, दर ६ तासांनी बदलणाऱ्या भरती-ओहोटी आणि जेलीफिशच्या दंशांमध्येही तो आर्यन खंबीरपणे पोहत राहिला. गोवा स्विमिंग असोसिएशनचे अध्यक्ष योगिराज कामत, SFI चे खजिनदार सुधेश, NIWS चे डॉ. पवन गुप्ता, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोव्याचे क्रीडामंत्री रमेश तवडकर, प्रशिक्षक डॉ. मोहन रेड्डी, पायलट, सुबोध सुळे, सचिन, दीपक यांनी आर्यनने सहकार्य केले. 

जिद्द, चिकाटी आणि धैर्याचा आदर्श प्रस्थापित केला

अथांग समुद्रात अविरत ४९ तास ४४ मिनिटे ०४ सेकंद पोहत तब्बल २१० किलोमीटरचे अंतर पार करणाऱ्या युवा जलतरणपटू आर्यन सिंग दादियाला याने जिद्द, चिकाटी आणि धैर्याचा आदर्श प्रस्थापित केला आहे. महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्या भावनेतून त्यानं ही मोहीम हाती घेतली होती, ही बाब मनाला भावनिक करणारी आहे. आर्यननं माझी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्याच्या या अद्वितीय कामगिरीचे मनापासून कौतुक केले, अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या. आर्यनची ही जिद्द, त्याग आणि दादांप्रती असलेली आदरभावना नक्कीच प्रेरणादायी आहे, असे सुनेत्रा पवार यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

Web Title : आर्यन सिंह ने 210 किमी तैरकर अजित पवार को किया सम्मानित; सुनेत्रा से मिले

Web Summary : आर्यन सिंह ने अजित पवार को समर्पित करते हुए 210 किमी तैराकी की और सुनेत्रा पवार से मिले। उन्होंने 49 घंटे तक तैरकर अंधेरे और धाराओं जैसी चुनौतियों को पार किया। तैराकी क्वेरीम से पोलेम बीच तक थी। उन्हें संघों और मंत्रियों का समर्थन मिला।

Web Title : Aryan Singh swims 210km, honors Ajit Pawar; meets Sunetra

Web Summary : Aryan Singh swam 210km, dedicating it to Ajit Pawar, meeting Sunetra Pawar. He swam for 49 hours, overcoming challenges like darkness and currents. The swim was from Querim to Polem beach. He was supported by associations and ministers.