शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

सदस्य कधी देणार लेखाजोखा?

By admin | Updated: February 20, 2017 02:11 IST

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या दोन वर्षांपूर्वी (११ जानेवारी २०१५) झालेल्या निवडणुकीतील विजयी उमेदवार दिलेल्या आश्वसनांची पूर्ती

देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या दोन वर्षांपूर्वी (११ जानेवारी २०१५) झालेल्या निवडणुकीतील विजयी उमेदवार दिलेल्या आश्वसनांची पूर्ती आणि विकासकामांचा लेखाजोखा कधी देणार याची प्रतीक्षा नागरिकांना आहे.सदस्य निवडीची अधिसूचना केंद्र सरकारकडून १८ फेब्रुवारी २०१५ ला जाहीर झाली होती. त्यानुसार बोर्ड प्रशासनाकडून २६ फेब्रुवारी २०१५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत निवडून आलेल्या सात सदस्यांसह लष्करी सदस्यांचा शपथविधी झाला होता. सर्व सदस्यांचा दोन वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाला असल्याने त्यांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार या कार्यकालात केलेल्या विकासकामांचा विस्तृत लेखाजोखा संबंधित नागरिकांना देणे क्रमप्राप्त आहे. नागरिकांनाही लेखाजोख्याची प्रतीक्षा आहे. बोर्डाकडून सदस्यांच्या पहिल्या वर्षाच्या कार्यकाळात २६ फेब्रुवारी २०१५ व १२ फेब्रुवारी २०१६ रोजी घेण्यात आलेल्या विशेष बैठकींसह २५ मार्च २०१५, २६ मे २०१५, २ जुलै २०१५, २७ आॅगष्ट २०१५, ३ डिसेंबर २०१५ अशा सात साधारण मासिक बैठका झाल्या. दुसऱ्या वर्षात आजतागायत विशेष बैठकीसह दहा फेब्रुवारी २०१६ ,२२ जून २०१६, २५जुलै २०१६, सहा आॅक्टोबर २०१६, १८ नोव्हेंबर २०१६,१७ डिसेंबर २०१६ व ३१ जानेवारी २०१७ अशा एकूण सात बैठका झाल्या आहेत. पहिल्या वर्षात सीबीआय तपासणी त्यानंतर दुसऱ्या वर्षात पहिले सहा महिने पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी नसल्याने तसेच काही महिने विविध विकासकामांच्या निविदा भरण्यास ठेकेदार प्रतिसाद देत नसल्याने विकासकामे रखडल्याचे दिसत होते. मात्र,गेल्या काही दिवसांत ठेकेदारांनी निविदा भरल्याने रस्ते सुधारणा व डांबरीकरणाची कामे सुरु झाल्याचे दिसत आहे. गटारी दुरुस्ती व सुधारणा कामेही सुरु झालेली आहेत. मात्र, बोर्ड प्रशासनाकडून कोणत्या भागात कोणती कामे सुरु आहेत, हे नागरिकांना माहित होत नाही. बोर्डाच्या सातही वॉर्डांत सुरु असलेली कामे, कामासाठी निविदा मंजूर रक्कम, काम करणाऱ्या ठेकेदाराचे नाव, कामाची मुदत, कामाचे आदेश आदी माहिती प्रसिद्ध करणे गरजेचे असतानाही पूर्वीप्रमाणे सर्व माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जात नाही. त्यामुळे कामाचे आदेश आदी सविस्तर माहिती नागरिकांच्या माहितीसाठी सूचनाफलक अगर संकेतस्थळावर प्रसिद्ध करायला हवी. जेणेकरून विकासकामांबाबत सर्वांना माहिती होऊ शकेल. बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार सुरुवातीला काही महिने अर्थ समितीच्या बैठका झाल्यांनतर पुन्हा बैठका संपन्न झाल्याचे दिसत नाही. या व्यतिरिक्त नागरी, शिक्षण, महिला व बालकल्याण तसेच आरोग्य समित्यांची स्थापना झाल्यांनतर प्रशासनाकडून पहिल्या वर्षभरात एक-एकच बैठक घेण्यात आलेली असल्याचे स्पष्ट झाले आहे. विविध समित्यांच्या बैठका घेण्याबाबत संबंधित समिती अध्यक्षांनी व समिती सदस्यांनी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक त्रिपाठी यांच्याकडे अनेकदा मागणी करूनही बैठका घेण्याबाबत चालढकल करण्यात आली होती, असे सदस्यांचे म्हणणे होते. त्यामुळे कोणताही विषय थेट मुख्य बैठकीत येत असल्याने मुख्य बैठक दीर्घकाळ चालत असल्याचे दिसून येत होते. मात्र, दुसऱ्या वषीर्ही विविध समिती बैठका होत नसल्याचे दिसून येत असून समित्या नावापुरत्या उरल्या आहेत का अशी शंका उपस्थित होत आहे. (वार्ताहर)आश्वासनपूर्ती : काही प्रमाणात प्रयत्न सुरू४निवडणुकीपूर्वी जाहीरनामा प्रसिद्ध करताना जनेतला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या बाबतीत सदस्यांची काही प्रमाणात पावले पडू लागली आहेत. मात्र देहूरोड रेडझोनचा मुख्य प्रश्न प्रलंबित आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना राबविण्याबाबत यश आलेले नाही. त्याबाबत पाठपुरावा करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. पण, जनतेच्या अवलोकनासाठी सर्व सदस्यांनी दोन वर्षाच्या विकासकामांचा लेखाजोखा जनतेसमोर सादर करायला हवा.