शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

Bhimashankar Temple : भाविकांसाठी खुशखबर ...! भीमाशंकर मंदिर ३१ मे रोजी पुन्हा खुले होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 19:23 IST

Bhimashankar Temple : भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार मंदिर परिसरातील गर्दी व्यवस्थापन आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ही कामे हाती घेण्यात आली

पुणे : मुख्य सभामंडपाच्या पुनर्बांधणीसह विविध सुरक्षा व सुविधा विकासकामे करण्यासाठी बंद असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर ३१ मे रोजी भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. ही कामे पूर्णत्वाच्या टप्प्यात आहेत. त्यामुळे गेल्या साडेतीन महिन्यापासून बंद असलेल्या मंदिरात भाविकांना आता सुलभ दर्शन घेता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार मंदिर परिसरातील गर्दी व्यवस्थापन आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ही कामे हाती घेण्यात आली होती. सुरुवातीला ९ जानेवारीपासून तीन महिने बंद ठेवण्याचे नियोजन होते, मात्र कामांच्या प्रगतीनुसार ही मुदत ३१ मे पर्यंत वाढवण्यात आली. नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या वाढत्या संख्येला अनुरूप सुविधा उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश होता. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २८८.१७ कोटी रुपयांचा निधीच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली.

यामध्ये भव्य नवीन सभामंडप उभारणी, जुन्या सभामंडपाचे पूर्ण काढणे, पायरी मार्ग (स्टेप वेव्ह), प्रवेश-निर्गमन मार्गांची सुधारण, गर्दी नियंत्रण व्यवस्था, व्ह्यूइंग कॉरिडॉर, विश्रांती क्षेत्रे इत्यादींचा समावेश आहे. सभामंडपाचे काम पारंपरिक तंत्रज्ञान वापरून वेगाने पूर्ण करण्यात आले असून, सध्या ९० टक्के काम पूर्ण झाले असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Bhimashankar Temple Reopens May 31st After Renovation for Pilgrims

Web Summary : Bhimashankar Jyotirlinga temple reopens May 31st after renovations for improved pilgrim safety and facilities. The works included a new assembly hall. The district administration prioritized completing the work, aiming to enhance the pilgrim experience and manage crowds effectively before the 2027 Nashik Kumbh Mela.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBhimashankarभीमाशंकरPuneपुणेTempleमंदिर