शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी जागेवरील ‘एसआरए’चा मार्ग मोकळा

By admin | Updated: July 3, 2014 05:37 IST

गेल्या सव्वादोन वर्षांपासून पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शासकीय व निम-शासकीय जागांवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए) राबविण्यास स्थगिती होती.

पुणे : गेल्या सव्वादोन वर्षांपासून पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शासकीय व निम-शासकीय जागांवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए) राबविण्यास स्थगिती होती. उच्च न्यायालयाने ही स्थगिती उठविण्याचे अंतिम आदेश दिल्यामुळे प्रलंबित ४० झोपडपट्ट्यांतील लाखो रहिवाशांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनाने शहरातील झोपडपट्टीतील नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी १९९५ ला एसआरए प्राधिकरणाची स्थापना केली. त्यानुसार प्राधिकरणाने महापालिकेच्या सहकार्याने झोपडपट्टीधारकांचे मोफत पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला. पुणे व पिंपरी या दोन्ही महापालिकांतर्गत सुमारे १८७ एसआरए प्रकल्पांचे प्रस्ताव दाखल झाले. त्यापैकी ५२ प्रस्ताव मंजूर झाले असून, २१ ठिकाणी पुनर्वसनासाठीची इमारत उभारण्यात आली आहे. दरम्यान, महापालिकेचे तत्कालीन आयुक्त महेश झगडे यांनी शासकीय आरक्षणाच्या जागा बिल्डरांना एसआरएसाठी मोफत देण्यावर आक्षेप घेतला होता. बिल्डरला २.५ एफएसआय दिले जाताना त्यांच्याकडून शासनाला कोणताही लाभ होत नाही. त्यामुळे शासकीय जागावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यापेक्षा खासगी जागेवर राबविण्याविषयीचे पत्र पुणे एसआरए प्राधिकरणाला १२ एप्रिल २०११ ला दिले होते. त्यामुळे शासकीय व निमशासकीय ४० जागांवरील झोपडपट्टींचे पुनर्वसन दोन वर्षांपासून रखडले होते. त्यावर राष्ट्रशक्ती संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दारवटकर यांनी पुणे एसआरए प्राधिकरणाकडे विचारणा केली. मात्र, एसआरए प्राधिकरणाने गृहनिर्माण विभागाकडे दाद मागण्यास सांगितले. त्या वेळी शासनाच्या गृहनिर्माण विभागाने कोणत्याही स्थगितीचा निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट केले. अखेर राष्ट्रशक्ती संघटना व अखिल हिराबाग सहकारी गृहरचना संस्थेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने शासनाला चार आठवड्यांत त्याविषयीचा अंतिम निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर शासनाने बाजू मांडल्यानंतर शासकीय व निमशासकीय जागांवरील एसआरएची स्थिगिती रद्द करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा व एम. एस. सोनक यांच्या खंडपीठाने नुकताच घेतला आहे, अशी माहिती अ‍ॅड. सिद्धार्थ रोंघे यांनी दिली. (प्रतिनिधी)