शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

मोफत पार्किंगला अधिसभेत विरोध

By admin | Updated: September 29, 2014 05:39 IST

महाविद्यालयांकडून पार्किंगच्या नावाखाली विद्यार्थ्यांची लूट केली जात आहे. त्यामुळे विद्यापीठाने यात लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

पुणे : महाविद्यालयांकडून पार्किंगच्या नावाखाली विद्यार्थ्यांची लूट केली जात आहे. त्यामुळे विद्यापीठाने यात लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे. शनिवारी विद्यापीठाच्या अधिसभेतही या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. परंतु, अधिसभेतील बहुतांश सदस्यांनी मोफत पार्किंगला विरोध केला. त्यामुळे पुढील काळात मोफत पार्किंगच्या विषयावर विद्यार्थी संघटनांना पुन्हा एकदा संघर्ष करावा लागणार आहे.महाविद्यालयांचे उपन्नाचे साधन बंद होणार असल्याने अधिसभेवर निवडून गेलेल्या संस्थाचालकांनी, तसेच प्राचार्यांनी मोफत पार्किंगला विरोध केला. परिणामी, विद्यापीठातर्फे पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अहवालाचे काय होणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.विद्यापीठाने बहि:स्थ अभ्यासक्रम वाढीव शुल्कावर विद्यापीठ प्रशासनाला जाब विचारण्यात आला. परंतु, वाढविलेले शुल्क योग्य असून, त्यांना लवकरच शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले. विद्यापीठाने केंद्र शासनाच्या स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनशी करार केला आहे. परंतु, कौशल्य अभ्यासक्रम केवळ पदव्युत्तर पदवीसाठी सुरू केले आहेत. पदवी अभ्यासक्रमापासूनच कौशल्यावरील अभ्यासक्रम सुरू करावेत, अशी भूमिका अधिसभा सदस्यांनी मांडली. त्याचबरोबर विद्यापीठाच्या आरक्षण कक्षाकडून महाविद्यालयांचे रोश्टर चुकीच्या पद्धतीने तपासून दिले जातात. तसेच रोश्टर तपासून न दिल्यामुळे महाविद्यालयांची शिक्षक भरती रखडली आहे. त्यामुळे संस्थाचालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे अधिसभा सदस्यांनी नमूद केले.