पुणे : मध्य पूर्वेतील संघर्षामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव पुण्याहून दुबईसाठी (शारजाह) जाणारी विमान उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. याचा मोठा फटका फक्त पर्यटकांनाच नव्हे, तर कामानिमित्त दुबईला जाणाऱ्या व्यावसायिकांनाही बसला होता. मात्र, आता हा अडथळा दूर झाला असून, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुबईसाठीची विमानसेवा पुन्हा पूर्ववत झाली आहे.
गेल्या काही काळापासून अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे, पुणे विमानतळावरील फक्त प्रवासी वाहतूकच नव्हे, तर कार्गो (मालवाहतूक) सेवादेखील बंद होती. ती आता पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली आहे. यामुळे पुणे आणि परिसरातील औद्योगिक पट्ट्यातील उत्पादने आता थेट दुबई देशांत पोहोचवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
युद्धजन्य तणावपूर्ण परिस्थितीमुळे सुरक्षेला प्राधान्य देत पुण्याहून दुबईला होणारी काही उड्डाणे रद्द करावी लागली होती. मात्र, आता परिस्थिती नियंत्रणात असल्याने आणि आवश्यक सुरक्षा नियमांची पडताळणी करून आम्ही सेवा पुन्हा सुरू केली आहे. या विमानसेवेसोबतच कार्गो सेवेलाही सुरू केले आहे. - संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे
Web Summary : Pune-Dubai flights have resumed after being temporarily suspended due to Middle East tensions. This benefits tourists and business travelers. Cargo services have also restarted, facilitating trade between Pune and Dubai. Airport authorities confirm the resumption after security checks.
Web Summary : मध्य पूर्व में तनाव के कारण पुणे-दुबई उड़ानें फिर से शुरू हो गई हैं। इससे पर्यटकों और व्यवसायिक यात्रियों को लाभ होगा। कार्गो सेवाएं भी फिर से शुरू हो गई हैं, जिससे पुणे और दुबई के बीच व्यापार सुगम होगा। हवाई अड्डा प्राधिकरण सुरक्षा जांच के बाद फिर से शुरू होने की पुष्टि करता है।