शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

दरोडेखोरांवर गोळीबार

By admin | Updated: September 24, 2015 03:00 IST

संशयित कारकडे चौकशीसाठी जात असतानाच दरोडेखोरांनी पोलिसांच्या अंगावर कार घालून पलायन केले. पोलिसांनी पाठलाग केला

जेजुरी/ राजेवाडी : संशयित कारकडे चौकशीसाठी जात असतानाच दरोडेखोरांनी पोलिसांच्या अंगावर कार घालून पलायन केले. पोलिसांनी पाठलाग केला. त्यांच्या वाहनावर गोळीबारही केला. मात्र, चार संशयित दरोडेखोरांनी वाहन तेथेच सोडून अंधाराचा फायदा घेत पलायन केले. ही घटना जेजुरी शहराच्या मुख्य चौकात बुधवारी (दि.२३ ) मध्यरात्री १ ते २ च्या दरम्यान घडली. पोलिसांनी घातक शस्त्रांसह वाहन जप्त केले आहे.पोलीस कर्मचारी रणजित निगडे यांनी फिर्याद दाखल केली आहे. रणजित निगडे आणि सहा. फौजदार डी. जी. भोसले शहर परिसरात गस्त घालीत होते. चौकात पांढऱ्या रंगाची कार संशयितरीत्या उभी होती. चौकशीसाठी पोलीस त्या वाहनाजवळ जात असतानाच गाडीतील चार इसमांनी थेट पोलिसांच्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. नंतर सासवडकडे पलायन केले. प्ही घटना या पोलिसांनी सहा. पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांना भ्रमणध्वनीवरून कळविली. त्यांनीही तत्काळ पोलीस ठाण्याला माहिती दिली. राज्यमार्गावर नाकाबंदी करण्यात आली. सासवडच्या दिशेने दरोडेखोरांचा पाठलाग सुरू केला. हवेली विभागाच्या पोलीस कर्मचारी रौकी देवकाते, नाईक साठे यांनी सासवडमार्गे शिंदवणे घाटाकडे जाणाऱ्या दरोडेखोरांच्या वाहनाला घेरले. तर पाठीमागून जेजुरी पोलिसांचे पथक पाठलागावर असल्याने दरोडेखोरांनी वाघापूरमार्गे माळशिरसकडे मोर्चा वळवला. मात्र, आंबळे गावानजीक रेल्वे फाटक लागल्याने पुढे जाता येईना. त्यांची कार नजरेच्या टप्प्यात आल्याचे दिसताच रामदास शेळके यांनी वाहनावर आपल्या पिस्तुलातून चार गोळ्या झाडल्या. मात्र, अंधाराचा फायदा घेत दरोडेखोरांनी गाडी सोडून पलायन केले. विभागीय पोलीस आयुक्त तानाजी चिखले, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भरते यांनी पोलीस ठाण्याला भेट देत माहिती घेतली. पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे दरोड्याचा प्रयत्न असफल झाला. सहा. पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली शिवा खोकले, संतोष अर्जुन, संतोष मेढेकर तपास करीत आहेत. (वार्ताहर)