शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

डीपीचे अंतिम चित्र आज मांडणार

By admin | Updated: September 26, 2015 02:41 IST

गेल्या ७ वर्षांपासून काम सुरू असलेल्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्याचे (डीपी) अंतिम चित्र आज स्पष्ट होणार आहे. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीकडून हा आराखडा

पुणे : गेल्या ७ वर्षांपासून काम सुरू असलेल्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्याचे (डीपी) अंतिम चित्र आज स्पष्ट होणार आहे. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीकडून हा आराखडा आज (शनिवारी) राज्य शासनाकडे सादर केला जाणार आहे. डीपीमध्ये अनेक महत्त्वाचे बदल झाले असल्याची चर्चा असून, त्या बदलांकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. या डीपीमध्ये नेमके काय बदल केले आहेत, याचे चित्र आज स्पष्ट होण्याची शक्यता आहे.शहराच्या पुढील २० वर्षांतील गरजा लक्षात घेऊन त्यादिशेने नियोजन करण्याकरिता महापालिकेच्या वतीने डीपी तयार केला जातो. त्यामध्ये शहरातील रस्ते, आरोग्य सुविधा, शाळा, महाविद्यालये, उद्याने याकरिता जागा आरक्षित केल्या जातात. शहराच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन, त्या दृष्टीने डीपीमध्ये आरक्षणे टाकली जातात. त्याचबरोबर नागरिकांच्या जागेवर आरक्षणे पडत असल्याने त्यांच्यासाठीही डीपी हा अत्यंत महत्त्वाचा असतो. या डीपीतील अंतिम तरतुदी उघड होणार आहे. विभागीय आयुक्तांच्या समितीला डीपी तयार करण्यासाठी २८ सप्टेंबरपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली होती. २७ सप्टेंबरला रविवारची सुट्टी असल्याने तो शनिवारी सादर केला जाणार आहे. पुणे शहराच्या जुन्या हद्दीचा डीपी १९८७ मध्ये तयार करण्यात आला होता. या डीपीचे पुनर्विलोकन करण्याची प्रक्रिया २००८ मध्ये सुरू करण्यात आली आहे. विकास आराखडा समितीने सुचविलेली ३ एफएसआय कमी करण्याची शिफारस डीपी समितीने केली आहे.जुन्या हद्दीचा डीपी तयार करण्याची प्रक्रिया २००८ पासून सुरू करण्यात आली आहे. राज्य शासनाने २०१० मध्ये अधिसूचना काढून ते तयार करण्याचे काम हाती घेतले. मात्र, त्यानंतर ७ वर्षांपासून हे काम अद्याप सुरूच आहे. डीपीचा आराखडा मंजूर करून, त्यावर हरकती मागविण्यात आल्या. डीपीवर ८७ हजार हरकती नोंदविण्यात आल्या होत्या. त्यांची सुनावणी घेण्यासाठीच एक वर्षाचा कालावधी लागला. त्यानंतर मुख्य सभेकडे नियोजन समितीने त्याचा अहवाल सोपविला. मात्र, समितीमधील सदस्यांनी दोन अहवाल सोपविल्यामुळे अडचण निर्माण झाली. त्यामध्ये मुख्य सभेमध्ये या आराखड्यावर चर्चा न होता इतर मुद्द्यावरच गोंधळ सुरू राहिला. त्यातच डीपी तयार करण्यासाठी महापालिकेला देण्यात आलेली मुदत संपल्याने, राज्य शासनाने तडकाफडकी आदेश काढून डीपी महापालिकेच्या ताब्यातून आहे त्या स्थितीत ताब्यात घेतला. त्यानंतर विभागीय आयुक्तांची समिती नेमून त्यांना पुढील प्रक्रिया पार पाडण्यास सांगण्यात आले होते.