शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही चालवू तव सेवेचा वसा;पुण्यातील 'कोविड केअर सेंटर' मध्ये स्वयंसेवक म्हणून तरुणपिढी कार्यरत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 14:24 IST

तरुण पिढी या सेवाकार्यासाठी आपला जीव धोक्यात घालून रुग्णांच्या सेवेसाठी अहोरात्र झटत आहे..

ठळक मुद्दे २० ते २५ वयोगटातील तरुणाईचे प्रमाण अधिक

पुणे : स्वयंसेवी संस्थांना कोविड केअर सेंटर मध्ये काम करण्यासाठी स्वयंसेवकांचा तुटवडा जाणवत आहे. मात्र या संकट काळात २० ते २५ वर्षे वयोगटातील तरुण पिढी या सेवाकार्यासाठी आपला जीव धोक्यात घालून रुग्णांच्या सेवेसाठी अहोरात्र झटत आहे. तरुण पिढी फक्त मोबाईलमध्येच दंग असते त्यांना आसपास काय घडतंय यांच्याशी काही देणेघेणे नसते या समजुतीला युवा पिढीने आपल्या निस्वार्थी सेवेतून छेद दिला आहे. 

   गरवारे महाविद्यालय येथे समर्थ भारत पुनर्बांधणी योजनेअंतर्गत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, महापालिका , सह्याद्री हॉस्पीटल आणि गरवारे महाविद्यालय यांच्या वतीने कोविड केअर सेंटर कार्यरत आहे. यामध्ये स्वयंसेवक म्हणून युवा पिढी काम करत आहे. वैष्णवी राठी या युवतीने नोकरीपेक्षा सेवा कार्याला महत्व देऊन एक वेगळा आदर्श युवापिढीसमोर निर्माण केला आहे. या अनुभवाविषयी तिने 'लोकमत' ला सांगितले की फेब्रुवारी मार्च पासून कोरोनाचे संकट आल्यावर डोक्यात एकच विचार होता की लोकांना मी कशा प्रकारे मदत करू शकते. गरवारे कॉलेजला कोविड केअर सेंटर सुरू होणार आहे असे कळले. दरम्यान, मी नोकरीसाठी अर्ज केला होता आणि त्यामध्ये माझी निवड झाली. ऑफिसला माझ्या सामाजिक कामाची कल्पना दिली आणि १५ दिवसांनी जॉईन होईन असे कळविले. पण त्यांच्याकडून कोणतेच उत्तर आले नाही. मग बाबांसमोर माझी नोकरी जाण्याची भीती व्यक्त केली. तेव्हा बाबा म्हटले की नोकरी गेली तरी ती परत मिळेल. पण ही संधी परत मिळणार नाही.त्यानंतर कोविड केअर सेंटरला काम करण्यासाठी सज्ज झाले. ज्या लोकांच्याजवळ जायला इतर लोक घाबरतात त्यांच्यासाठी आम्ही काम करत आहोत याचे खूप समाधान वाटत असल्याची भावना तिने व्यक्त केली. .....

 असे असते कामाचे स्वरूप 

स्वयंसेवकाना कामाच्या शिफ्ट दिल्या जातात. स्वयंसेवकांना सर्जिकल कॅप, मास्क दिला जातो. स्वयंसेवकांनी सकाळी काढयाचे ग्लास कोविड रुग्णाच्या इमारतीत जाऊन ते रुग्णांच्या खोलीबाहेर ठेवायचे. रुग्णाला कुणी पार्सल दिले तर ते पाहोचवायचे, नवीन प्रवेश घ्यायचा किंवा डिस्चार्ज देण्याची यादी तयार करायची. पीपीई किट घालून रुग्णाचे प्लस, एसपीओटू आणि टेम्प्रेचर चेक करायचे. रुग्णांना जेवण देण्याबरोबरच रुग्णांना बाहेरून गोळ्या आणून देणे, खासगी रुग्णालयात चाचणी करून आणणे ही कामे स्वयंसेवक करतात. आमची पूर्णपणे काळजी घेतली जाते. आम्हाला काढा आणि आयुर्वेदिक औषधे दिली जात असल्याचे वैष्णवीने सांगितले.

....... 

आमच्याकडे सध्या २२५ स्वयंसेवकांची नोंदणी झालेली आहे. यात ९९ टक्के प्रमाण हे तरुणाईचेच आहे. आठवड्याला ३५ स्वयंसेवकांची गरज भासते. दर आठवड्याला २५ स्वयंसेवक येतात. गरवारे, डेक्क्कनच्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे वस्तीगृह येथे कोव्हिडं केअर सेंटर सुरू आहे. लवकरच कंमिन्स येथे सेंटर सुरू केले जाणार आहे. सणावारामुळे स्वयंसेवकांची कमतरता जाणवत आहे.तरी या कार्यासाठी स्वयंसेवक म्हणून नागरिकांनी पुढे यावे.

- महेश पोहनेरकर, समन्वयक कोविड केअर सेंटर. 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस