शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

‘हरित लवादा’कडून मुदतवाढ

By admin | Updated: January 23, 2015 00:15 IST

‘राष्ट्रीय हरित लवादा’ने दिलेल्या आदेशाविरोधात पालिकेकडून सर्वोच्च न्यायालयात ५ फेब्रुवारी पूर्वी प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येणार आहे.

पुणे : ‘वारजे ते विठ्ठलवाडी’ या मार्गावर मुठा नदीपात्रात महापालिके कडून तयार करण्यात येत असलेल्या रस्त्याबाबत ‘राष्ट्रीय हरित लवादा’ने दिलेल्या आदेशाविरोधात पालिकेकडून सर्वोच्च न्यायालयात ५ फेब्रुवारी पूर्वी प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी महापालिकेने गुरुवारी लवादासमोर प्रतिज्ञापत्र सादर करून, मुदतवाढ घेतली असून, ही मुदत ५ फेब्रुवारीपर्यंत असल्याचे अतिरिक्त नगर अभियंता विवेक खरवडकर यांनी मुख्यसभेत सांगितले. दरम्यान, सिंहगड रस्त्यासाठी ‘खडकवासला ते पर्वती’दरम्यान असलेल्या कालव्या वरून नवीन रस्ता करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नगरसेविका मंजूषा नागपुरे यांनी मुख्यसभेत पर्यायी रस्त्याबाबत विचाराणा केली. तसेच, नदीपात्रातील रस्त्याबाबत पालिका काय निर्णय घेणार, याची विचारणा केली. तसेच, महापालिकेने ‘हरित लवादा’पुढे योग्य बाजू मांडली नाही, त्यामुळे निकाल विरोधात केल्याचा आरोप नागपुरे यांनी केला. त्यानंतर युगंधरा चाकणकर, विकास दांगट, दिलीप बराटे, विशाल तांबे, अप्पा रेणुसे, अशोक येनपुरे, सभागृह नेते सुभाष जगताप यांनी हा रस्ता गरजेचा आहे. स्थानिक नागरिकांच्या लिखित सूचना घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्याव्यात. तसेच, हा रस्ता मार्गी लागेल, यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी केली. तर, जगताप यांनी नदीपात्रातील सध्याच्या रस्त्यास न्यायालयाने परवानगी दिल्याचे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यावे, अशी सूचनाही केली. त्यानंतर खुलासा करताना, खरवडकर म्हणाले, की ‘हरित लवादा’च्या आदेशानुसार १५ दिवसांत भराव काढून टाकावा लागणार आहे. परंतु, सुमारे ८० हजार ट्रक राडारोडा आहे. त्यामुळे कार्यवाहीस वेळ लागणार आहे. तसेच, महापालिकेला सर्वोच्च न्यायालयात जायचे आहे. यासंदर्भात आज ‘हरित लवादा’कडे प्रतिज्ञापत्रक सादर केले होते. त्यांनी आजपासून १५ दिवस अर्थात ५ फेब्रुवारीपर्यंत परवानगी दिली आहे. रस्त्याला पर्याय निर्माण होणार आहे. (प्रतिनिधी)‘पर्वती जलकेंद्र ते हिंगणे’पर्यंतचा कॅनॉलकाठचा रस्ता तयार करण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. तसेच, विश्रांतीनगर येथील रस्ता रुंदीकरणासाठीही तरतूद करण्यात आली आहे. ही कामे झाल्यास सिंहगड तसेच सिंहगड रस्त्याला पर्याय म्हणून बंद पाइपलाइन (कालवा) कडेचा रस्ता विकसित करण्यात येणार. या रस्त्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद असून, विश्रांतीनगर येथील रस्ता रुंद करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, त्यासाठी सर्व तयारीही प्रशासनाने पूर्ण केल्याचे खरवडकर यांनी सांगितले.