शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्याशी खेळ ! नदीबरोबरच आता धरणातही मैलापाणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 06:00 IST

ड्रेनेजचे पाणी नदीत किंवा धरणात सोडण्यापुर्वी नियमाप्रमाणे त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक

ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना याबाबतचे निवेदनपाणी एकतर थेट धरणात सोडले जाते किंवा शोषखड्डे करून जमिनीत मुरवले जाते हे स्पष्टमहापालिका, पाटबंधारे खात्याचे दुर्लक्ष

पुणे : मुळा, मुठा नद्यांबरोबरच आता खडकवासला धरणातही मैलापाणी सोडले जाऊ लागले आहे. धरणाच्या आसपासच्या गावांचे नागरीकरण होत असून तिथे बांधण्यात येणाऱ्या सोसायट्यांमधील ड्रेनेज धरणात सोडले जात असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे होत आहेत. पुणेकरांच्या सार्वजनिक आरोग्याशी यातून खेळ होत आहे.शहरातून वाहणाऱ्या मुठा तसेच मुळा या नद्यांमध्ये गेली अनेक वर्षे ड्रेनेजचे पाणी सोडले जाते. त्यामुळे या पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण शुन्यावर आले असून पाण्यातील जैवविविधता नष्ट झाली असल्याचे पर्यावरणविषयक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. तोच प्रकार आता पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात होत आहे. धरणाच्या भोवताली अनेक गावे आहेत. या गावांमध्ये वेगाने नागरीकरण होत आहे. मोठ्या सोसायट्या बांधल्या जात आहेत. अनधिकृत बांधकामाचे प्रमाणही बरेच आहे. या सोसायट्यांच्या ड्रेनेजसाठी शोषखड्डे घेतले जातात. ड्रेनेजचे पाणी सोडण्याची काहीच व्यवस्था नसल्याने बांधकाम व्यावसायिक किंवा खासगी बंगलेवालेही शोष खड्डा करून तिथेच हे पाणी मुरवतात. ते पाणी झिरपून धरणात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल यांनी याबाबत महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना नुकतेच निवेदन दिले. त्यात त्यांनी गावांची नावेही दिली आहेत. महापालिकेने याकडे लक्ष द्यावे. धरणातून पाणी पिण्यासाठी सोडले जाण्यापुर्वी त्यावर शुद्धीकरण प्रक्रिया केली जात असली तरी पाण्यात या पद्धतीने मैलापाणी झिरपणे धोकादायक आहे, त्यामुळे महापालिकेने या गावांची पाहणी करून असे होत असेल तिथे त्वरीत कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.आयुक्तांबरोबरच बागूल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनाही याबाबतचे निवेदन पाठवले आहे. ड्रेनेजचे पाणी नदीत किंवा धरणात सोडण्यापुर्वी नियमाप्रमाणे त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे, मात्र या गावांमध्ये कुठेही अशी प्रक्रिया करणारे प्रकल्प नाहीत. त्यामुळे ते पाणी एकतर थेट धरणात सोडले जाते किंवा शोषखड्डे करून जमिनीत मुरवले जाते हे स्पष्ट असूनही त्याकडे लक्ष दिले जात नाही असे त्यांनी त्यात नमुद केले आहे. जगभरात साथीच्या आजारांची लाट आलेली असताना पिण्याच्या पाण्याबरोबर सुरू असलेली ही बेपर्वाई त्वरीत बंद करावी असे त्यांनी म्हटले आहे.--------------------------------

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणीDamधरण