Dr Babasaheb Ambedkar Jayanti: "जय भीम"च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला; पुणे स्टेशन परिसरात भीमसागर लोटला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 17:25 IST2026-04-14T17:24:07+5:302026-04-14T17:25:03+5:30

Dr Babasaheb Ambedkar Jayanti पुणे शहरासह ग्रामीण भागातून आणि उपनगरातून आलेल्या हजारो अनुयायांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केले

Dr Babasaheb Ambedkar Jayanti The entire area was filled with chants of "Jai Bhim"; Bhim Sagar rolled around the Pune station area! | Dr Babasaheb Ambedkar Jayanti: "जय भीम"च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला; पुणे स्टेशन परिसरात भीमसागर लोटला!

Dr Babasaheb Ambedkar Jayanti: "जय भीम"च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला; पुणे स्टेशन परिसरात भीमसागर लोटला!

पुणे: सकाळच्या कोवळ्या उन्हात पुणे स्टेशनचा परिसर निळ्या ध्वजांनी आणि आंबेडकरी अनुयायांच्या उपस्थितीने निळाशार झाला होता. सकाळपासून भीमसैनिकांनी "जय भीम" च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे. यावेळी पुणे शहरासह ग्रामीण भागातून आणि शेजारच्या जिल्ह्यांतूनही तसेच उपनगरातून हजारो अनुयायी सकाळपासूनच बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी रांगेत उभे राहून मेणबत्ती लावून व फुले वाहून आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त चंद्रकांत कुंडलवार, मनपा आयुक्त नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी डॉ. जितेंद्र डुडी, समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे, आमदार बापूसाहेब पठारे, आ. चेतन तुपे, माजी आमदार मोहन जोशी, महापालिका सभागृहनेते गणेश बिडकर, ज्येष्ठ नेते बाळासाहेब जानराव, रिपाई शहराध्यक्ष संजय सोनवणे,नगरसेवक निलेश आल्हाट, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील, मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांच्यासह विविध शासकीय अधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण अभिवादन केले. यावेळी संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचनही करण्यात आले.

'निळ्या' रंगात ही न्हाऊन निघाला पुणे स्टेशन परिसर...

पांढर्या शुभ्र कपड्यांवर निळा शेला, हातात निळा झेंडा, छातीवर बाबांचा बिल्ला, हार-फुले अर्पन करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी झालेली अबाल वृद्धांची अलोट गर्दी, अन् मुखातून निघणारा ‘भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ अशी गननभेदी घोषणा, या जोडीला ‘सोनियाची उगवली सकाळ... जन्मास आले भिम बाळ’ यांसह विविध अजरामर भिम गीतांनी दणाणलेला परिसर, आणि बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर सहकुटुंब फोटो काढण्यासाठीची धडपड, अशा उत्साहपूर्ण वातावरमात मंगळवारी पुणे शहरातीस मुख्य स्टेशन परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा येथे मोठया उत्साहात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी भीमसागर लोटला! तर दूपारच्या वेळी परिसरात थोडी गर्दी मंदावळी तर सायं सहा नंतर परिसारात गर्दीचा ओघ वाढला तर रस्त्यावर डीजेच्या तालावर तरूणाई भीम गीतावर नाचत जल्लोषात भीमरायांना वंदन करीत मिरवणूक निघाल्या.

शिस्तबद्ध रांगा आणि पोलिसांच्याकडून चोख सुरक्षा व्यवस्था

वाढती गर्दी लक्षात घेता, पुणे पोलीस दलाने चोख बंदोबस्त तैनात केला आहे. दर्शनासाठी महिला आणि पुरुषांच्या स्वतंत्र रांगा लावण्यात आल्या आहेत. स्वयंसेवक देखील पोलिसांच्या मदतीला तत्पर असून, जनसागराला नियंत्रित करण्याचे काम अत्यंत संयमाने सुरू होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शहर पोलिसांच्या वतीने पुणे स्टेशन व कॅम्प परिसरासह संपूर्ण शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता.

 १० हजार मिसळ वाटप व अन्नदान 

 अनेक सामाजिक संस्थांकडून अनुयायांसाठी पिण्याचे पाणी, ताक आणि अल्पोपहाराची सोय करण्यात आली आहे. तर एकता मिसळकडून १० हजार मिसळ वाटप करून अनुयांना मिसळीचा आस्वाद घेतला.

 चैतन्यमयी सांस्कृतिक वातावरण

अभिवादनासाठी येणारे अनुयायी पारंपारिक वेशभूषेत दिसत असून, ठिकठिकाणी भीमगीतांचे कार्यक्रम आणि लेझीम पथकांचे सादरीकरण लक्ष वेधून घेत आहे. बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे स्टॉल्सही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लागले असून तरुणांचा प्रतिसाद सकारात्मक दिसत होता.

Web Title : अंबेडकर जयंती पर 'जय भीम' के नारों से पुणे स्टेशन गूंजा

Web Summary : पुणे में अंबेडकर जयंती धूमधाम से मनाई गई। पुणे स्टेशन पर हजारों लोग 'जय भीम' के नारे लगाते हुए जमा हुए। सांस्कृतिक कार्यक्रम, पुस्तक स्टॉल और भोजन वितरण कार्यक्रम का हिस्सा थे, सुरक्षा व्यवस्था चाक-चौबंद थी।

Web Title : Pune Station Swamped with 'Jai Bhim' Chants for Ambedkar Jayanti

Web Summary : Pune celebrated Ambedkar Jayanti with fervor. Thousands gathered at Pune Station, chanting 'Jai Bhim'. Cultural programs, book stalls, and food distribution marked the event, with tight security ensuring order.