होर्डिंग नियमावलीवरून पदाधिकारी व अधिकाऱ्यामध्ये 'तू तू - मैं मैं'; स्थायी समिती अध्यक्षांची बघून घेण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 12:52 IST2026-04-21T12:50:22+5:302026-04-21T12:52:05+5:30

पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या प्रकारावर आक्रमक भूमिका घेत भिमाले यांना जशास तसे उत्तर दिल्याचे समजते.

Dispute between Pune Municipal Corporation office bearers and officials over hoarding regulations; Threat to take action against the standing committee chairman | होर्डिंग नियमावलीवरून पदाधिकारी व अधिकाऱ्यामध्ये 'तू तू - मैं मैं'; स्थायी समिती अध्यक्षांची बघून घेण्याची धमकी

होर्डिंग नियमावलीवरून पदाधिकारी व अधिकाऱ्यामध्ये 'तू तू - मैं मैं'; स्थायी समिती अध्यक्षांची बघून घेण्याची धमकी

पुणे : शहरातील विविध ४०० ठिकाणी जाहिरात करण्यासाठी होर्डिंग उभारण्याच्या निविदेवरून आणि होर्डिंग नियमावलीवरून स्थायी समितीचे अध्यक्ष आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यात महापालिकेच्या मुख्य सभेतच वाद झाले. यावेळी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी अतिरिक्त आयुक्तांना बघून घेण्याची धमकी दिल्याची चर्चा असून भिमाले यांनी मात्र असे काही घडले नसल्याचे म्हटले आहे.

महापालिकेच्या वास्तू, पदचारी पूल, विजेचे खांब आणि होर्डिंग्ज यांच्या माध्यमातून उत्पन्न मिळवण्यासाठी ४०० ठिकाणी होर्डिंग उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या धोरणाचा गाभा ‘रेव्हेन्यू शेअरिंग’ मॉडेलमध्ये आहे. पारंपरिक कर प्रणालीला फाटा देत, प्रत्येक जाहिरात माध्यमातून किमान ३० टक्के महसूल थेट महापालिकेला देण्याची अट घालण्यात आली आहे. स्पर्धात्मक निविदेमुळे हा टक्का आणखी वाढू शकतो. तसेच महसुलात सातत्य राखण्यासाठी दर चार वर्षांनी ‘कन्सेशन फी’मध्ये ५ टक्क्यांची वाढ करण्याची तरतूद करण्यात आली आहे. युनिपोल्स, होर्डिंग्ज आणि विजेच्या खांबांवरील जाहिरातींमधून सर्वाधिक उत्पन्न अपेक्षित असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दरवर्षी महापालिकेला या प्रकल्पातून सुमारे ५० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा दावा करण्यात येत आहे. या योजनेतंर्गत शहरात ११ आधुनिक पादचारी पूल उभारले जाणार असून, त्यामध्ये लिफ्ट आणि एस्केलेटरची सुविधा असणार आहे. शहराच्या प्रवेशद्वारांवर आकर्षक आर्च उभारण्याचाही प्रस्ताव आहे. पारंपरिक फलकांच्या जागी डिजिटल युनिपोल्स आणि ग्लो-साइन बोर्ड्स उभारून शहराचा चेहरा आधुनिक करण्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.

महापालिकेची सोमवारी मुख्य सभा सुरू असताना भिमाले यांनी महापौरांच्या ‘चेअर’शेजारी बसणाऱ्या महापालिका आयुक्त नवलकिशोर राम आणि नवनियुक्त अतिरिक्त प्राजित नायर यांना यांची भेट घेतली. या ठिकाणी वाद सुरू असल्याचे सहज लक्षात येत होते. वादावादाची प्रकार पाहून महापौरांकडून तातडीने सभागृह नेते गणेश बीडकर यांना पाचारण केले. या सर्व प्रकाराची माहिती घेतल्यानंतर भिमाले यांच्याकडून जाहिरात धोरणाला तातडीने मंजुरी देण्याची मागणी केली होती. त्यास अति. आयुक्त नायर यांनी विरोध दर्शवत महापालिका हितासाठी अन्य काही अटींची आवश्यकता असल्याचे सांगितले. यावेळी झालेल्या वादातून मी स्थायी समितीत बघून घेतो, असा थेट दम भिमाले यांनी दिल्याची चर्चा आहे. या प्रकारावर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनीही आक्रमक भूमिका घेत भिमाले यांना जशास तसे उत्तर दिल्याचे समजते.

या प्रकाराबाबत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारणा केली असता त्यांनी या प्रकारास दुजोरा दिला. घडलेला प्रकार हा अयोग्य असून याबाबत आवश्यकता भासल्यास योग्य त्या ठिकाणी दाद मागण्यात येईल, असे सांगितले. तसेच, या प्रकाराबाबत अन्य माहिती देण्यास नकार दिला. दरम्यान, याबाबत भिमाले यांना विचारणा केली असता, असा कोणताही वाद झाला नाही. माझी इतर चार कामे होती, म्हणून मी आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांकडे गेलो होते, असे सांगितले.

Web Title : होर्डिंग नियमों पर पुणे निकाय प्रमुखों में टकराव; धमकियां दी गईं

Web Summary : पुणे नगर निगम के प्रमुखों के बीच होर्डिंग नियमों को लेकर टकराव हुआ, बैठक के दौरान धमकियां दी गईं। होर्डिंग के लिए राजस्व-साझाकरण मॉडल की योजना है, जिससे संभावित रूप से सालाना ₹50 करोड़ उत्पन्न होंगे। शर्तों पर असहमति के कारण तीखी बहस और धमकियां हुईं, जिससे आधिकारिक प्रतिक्रियाएं और इनकार हुए।

Web Title : Pune Civic Body Heads Clash Over Hoarding Rules; Threats Exchanged

Web Summary : Pune civic heads clashed over hoarding regulations, with threats exchanged during a meeting. A revenue-sharing model for hoardings is planned, potentially generating ₹50 crore annually. Disagreements arose regarding terms, leading to heated exchanges and threats, prompting official responses and denials.