शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक राजाला बनवले जातेय मूर्ख :  कंपन्यांची दिशाभूल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 07:00 IST

शहरातील एक कंपनी आपले एकाच पद्धतीचे उत्पादन दोन वेगवेगळ्या किंमतीला विकत आहे.

ठळक मुद्देचहाच्या एकाच ब्रँडची वेगवेगळी किंमतउत्पादनांच्या वाढीव किंमतीचा वापर एकावर एक मोफत देण्यासाठी केला जात असल्याचे समोर

विशाल शिर्के पुणे : ग्राहक हा राजा असतो असे म्हटले जात असले तरी त्याला विविध माध्यमातून मूर्ख बनविण्याचे काही कंपन्यांचे उद्योग अजूनही सुरुच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. शहरातील एक कंपनी आपले एकाच पद्धतीचे उत्पादन दोन वेगवेगळ्या कमाल किरकोळ विक्री (एमआरपी) किंमतीला विकत आहे. एक किलो वजनाच्या एकाच प्रकारच्या चहाची पिशवी २४० आणि ४०० रुपये आहे. एकाच उत्पादनाची दोन किंमतींना विक्री करण्याबरोबरच, या उत्पादनांच्या वाढीव किंमतीचा वापर एकावर एक मोफत देण्यासाठी केला जात असल्याचे समोर आले आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने पोलीस आणि वैधमापन शास्त्र विभागाकडे तक्रार करुनही त्याची कोणतीच दखल घेतली जात नाही, हे विशेष! ग्राहक हा बाजारपेठेतील राजा मानला गेला आहे. काही कंपन्या मात्र, विविध युक्ती वापरुन ग्राहकांची चक्क फसवणूक करीत असल्याचे समोर आले आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पुणे महानगर अध्यक्ष विजय सागर यांनी ही बाब समोर आणली असून, पोलीस आणि वैधमापन विभागाकडे तक्रार दिली आहे. मार्केट यार्ड येथील एका कंपनीच्या रॉयल आणि जॉयल या चहाच्या दोन ब्रँड विरोधात ही तक्रार आहे. या दोनही ब्रँडच्या पॅकींगचे रंग आणि त्यातील पदार्थ एकच आहेत. असे असताना रॉयल ब्रँड आणि जॉयल या ब्रँडची प्रत्येकी दोन वेगवेगळ््या किंमतीतील पाकिटे बाजारात उपलब्ध आहेत. काही दुकानांमधे एका पॅकेटवर एक मोफत अशा योजनांद्वारे देखील त्याची विक्री केली जात आहे. चारशे रुपये एमआरपी असलेले रॉयल चहाचे एक पॅकेट घेतल्यास त्यावर एक मोफत मिळेल. तसेच, त्याची किंमतही ३८० रुपये आहे. म्हणजेच एक किलो वजनाच्या रॉयल चहाची किंमत २८० आणि ४०० रुपये आहे. उदबत्ती, प्रथितयश कंपन्यांचीची टूथपेस्ट, सौंदर्य प्रसाधनाची क्रीम, जंतूनाशक कंपन्यांचे साबण, दररोजच्या वापरातील साबण, थंडीपासून त्वचेचे संरक्षण करणारी पेट्रोलियम जेली, चहा, शॅम्पू, कपड्यावरील कोणताही डाग काढून टाकण्याचा दावा करणाºया कंपन्यांची पावडर आणि बिस्कीट अशा विविध उत्पादनांमध्ये कंपन्यांकडून वजन आणि त्याच्या एमआरपी किंमतीमधे लूट केली जात असल्याचे डिसेंबर २०१८मधे लोकमतने उघड केले होते. या प्रकरणी संबंधितांवर अजून कोणतीही कारवाई झालेली नाही. --------------

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी