Crime News : चार संशयितांकडून नऊ पिस्तूल, पाच मॅगझीन, ४६ काडतुसे जप्त

By नारायण बडगुजर | Updated: May 6, 2026 19:46 IST2026-05-06T19:46:27+5:302026-05-06T19:46:36+5:30

Crime News - गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई : आठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Crime News Nine pistols, five magazines, 46 cartridges seized from four suspects | Crime News : चार संशयितांकडून नऊ पिस्तूल, पाच मॅगझीन, ४६ काडतुसे जप्त

Crime News : चार संशयितांकडून नऊ पिस्तूल, पाच मॅगझीन, ४६ काडतुसे जप्त

पिंपरी : पिंपरी -चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत अवैध शस्त्रसाठ्यावर सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान गुन्हे शाखा युनिट एकने मोठी कारवाई करत चार संशयितांना अटक केली आहे. या कारवाईत नऊ देशी कट्टे, पाच मॅगझिन, ४६ जिवंत काडतुसे व दोन वाहने असा सुमारे आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. देहूरोड परिसरात व्यापाऱ्यावर गोळीबार करून हत्या झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अधिक तीव्र करण्यात आली होती.

अझरुद्दीन रफिक सुतार (वय ३०), वैभव अशोक शेटे (३१, दोघेही रा. महाराष्ट्र कॉलनी, थेरगाव, पुणे), सौरभ धनंजय जाधव (२७) आणि अक्षय अशोक कांबळे (३१, दोघेही रा. पाषाण, पुणे) या संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. अझरुद्दीन सुतार हा डिलिव्हरी बाॅय म्हणून काम करतो. वैभव शेटे हा सोशल मीडियावर मॅनेजमेंट करत असतो. सौरभ जाधव हा इस्टेट एजंट असून अक्षय कांबळे हा मजुरी करतो. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी- चिंचवड शहरात गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार अवैध शस्त्रांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. देहूरोड येथे गोळीबार करून व्यापाऱ्याच्या निर्घृण खून केल्याच्या घटनेनंतर या मोहिमेला अधिक गती देण्यात आली. गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुळीग आणि श्रेणी उपनिरीक्षक शिवानंद स्वामी यांना संशयितांकडे शस्त्र असल्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी संशयितांना अटक केली. संशयितांकडून नऊ देशी कट्टे, पाच मॅगझीन व ४६ जिवंत काडतुसे, दोन वाहने असा आठ लाखांचा मुद्देामल जप्त केला. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेंद्र ठाकरे, सहायक निरीक्षक दत्तात्रय गुळीग, श्रेणी उपनिरीक्षक शिवानंद स्वामी, सहायक उपनिरीक्षक संतोष इंगळे, प्रमोद वेताळ, पोलिस अंमलदार जयवंत राऊत, महादेव जावळे, अजय डगळे, देवा राऊत, शिवराम भोपे, विजय शेळकंदे, सागर अवसरे, मारुती करचुंडे, उषा दळे, संदेश देशमुख, लक्ष्मीकांत पतंगे, विजय जानराव, तेजस भालचिम, केशव चेपटे, सोहेल चिखलकर, उद्धव खेडकर, दीपक तांदळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

Web Title : पिंपरी: चार गिरफ्तार, नौ पिस्तौल, गोला-बारूद जब्त, बड़ी कार्रवाई

Web Summary : पिंपरी-चिंचवड पुलिस ने चार संदिग्धों को गिरफ्तार कर ₹8 लाख मूल्य के नौ पिस्तौल, गोला-बारूद और वाहन जब्त किए। देहू रोड हत्या के बाद अभियान तेज।

Web Title : Pimpri: Four arrested, nine pistols, ammunition seized in major crackdown.

Web Summary : Pimpri-Chinchwad police arrested four suspects, seizing nine pistols, ammunition, and vehicles worth ₹8 lakh. The operation intensified after a Dehu Road murder.