‘डील’ महागात पडली ? ८० हजारांची लाच घेताना PSI रंगेहाथ पकडला; पुणे पोलिस दलात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 18:15 IST2026-05-05T18:15:19+5:302026-05-05T18:15:32+5:30

Crime News - अदखलपात्र गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि भविष्यात त्रास न देण्यासाठी त्यांनी १ लाख रुपयांची मागणी केली होती

Crime News 'Deal' turned out to be expensive? PSI caught red-handed while taking a bribe of Rs 80 thousand; There is a stir in the Pune Police Force | ‘डील’ महागात पडली ? ८० हजारांची लाच घेताना PSI रंगेहाथ पकडला; पुणे पोलिस दलात खळबळ

‘डील’ महागात पडली ? ८० हजारांची लाच घेताना PSI रंगेहाथ पकडला; पुणे पोलिस दलात खळबळ

पुणे : अदखलपात्र गुन्ह्यात मदत करण्यासाठी ८० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या लोहगाव पोलिस ठाण्यातील फौजदार (पोलिस उपनिरीक्षक) मनोज मधुकर बरुटे यांना पोलिस खात्यातून निलंबित करण्यात आले आहे. अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

एका ३९ वर्षीय तक्रारदाराच्या जमिनीच्या व्यवहाराशी संबंधित अदखलपात्र गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि भविष्यात त्रास न देण्यासाठी त्यांनी १ लाख रुपयांची मागणी केली होती, जी तडजोडीअंती ८० हजार रुपये ठरली. ३० एप्रिल रोजी आलेल्या तक्रार पडताळणीनंतर, १ मे रोजी लोहगाव पोलिस ठाण्यात सापळा रचून त्यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

या प्रकरणी बरुरे याच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार, लोहगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बरुटे कर्तव्यावर असताना केलेले वर्तन हे अत्यंत गंभीर, भ्रष्टाचारी व नैतिक अधःपतनाने पोलिस खात्याची प्रतिमा मलीन करणारे आहे, असा ठपका ठेवत त्याला खात्यातून निलंबित करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.

Web Title : पुणे: रिश्वत लेते रंगे हाथों पकड़ा गया पीएसआई; निलंबन

Web Summary : पुणे में पीएसआई जमीन विवाद मामले में मदद के लिए ₹80,000 रिश्वत लेते गिरफ्तार। भ्रष्टाचार निरोधक ब्यूरो ने रंगे हाथों पकड़ा, जिसके कारण पुलिस की छवि खराब करने के कारण निलंबन हुआ।

Web Title : Pune PSI caught red-handed taking bribe; Suspended after entrapment

Web Summary : PSI in Pune suspended for accepting ₹80,000 bribe for aiding a land dispute case. Anti-Corruption Bureau caught him red-handed, leading to his suspension due to corrupt conduct that tarnished the police image.