Crime News: शिरूरमध्ये दोन गटात दगडफेक, शिवीगाळ, धमक्या अन् तुफान गोंधळ; ५० जणांवर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 10:19 IST2026-04-15T09:59:01+5:302026-04-15T10:19:52+5:30

याप्रकरणी सार्वजनिक ठिकाणी बेकायदा जमाव जमवण्याच्या आरोपाखाली सामाजिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी दोन्ही गटांतील ५० जणांविरुद्ध शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे

Crime News Cases filed against 50 people in Shirur police station assault case | Crime News: शिरूरमध्ये दोन गटात दगडफेक, शिवीगाळ, धमक्या अन् तुफान गोंधळ; ५० जणांवर गुन्हे दाखल

Crime News: शिरूरमध्ये दोन गटात दगडफेक, शिवीगाळ, धमक्या अन् तुफान गोंधळ; ५० जणांवर गुन्हे दाखल

शिरूर : शिरूर पोलिस स्टेशनच्या आवारात मध्यरात्री दोन गटांमध्ये जोरदार संघर्ष झाला. दगडफेक, शिवीगाळ, धमक्या आणि तुफान गोंधळ झाला. जमाव नियंत्रणात येत नसल्याचे समजताच पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगवले. यात दोन जण जखमी झाले आहेत, आणि याप्रकरणी सार्वजनिक ठिकाणी बेकायदा जमाव जमवण्याच्या आरोपाखाली सामाजिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी दोन्ही गटांतील ५० जणांविरुद्ध शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. यात काही प्रतिष्ठितांसह सराईत गुन्हेगारांचादेखील समावेश आहे.

या घटनेबाबत पोलिस हवालदार सतीश नाथराव मुंडे यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी हरीश रवींद्र राजपूत, राजू शेवाळे, गणेश भोसले, विनोद जाधव, सलमान शेख, हाफिज शेख, कलिम सय्यद, कय्यूम सय्यद, तेजस जाधव, हबीब सय्यद, तरबेज, काळू बोरगे (सर्व रा. शिरूर) यांच्यासह अनोळखी ५० जणांविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी (दि. ११) मध्यरात्री बाराच्या सुमारास हरीश राजपूत हा आर्थिक वादातून राजू शेवाळे व इतरांविरुद्ध तक्रार देण्यासाठी शिरूर पोलिस स्टेशनला आला होता. त्यानंतर थोड्याच वेळात त्याच्या बाजूच्या आणि विरोधी गटातील तरुणांचा जमाव पोलिस ठाण्याच्या आवारात जमा झाला. पोलिस हवालदार उमेश भगत हे तक्रार घेत असतानाच जमलेल्या तरुणांमध्ये आरडाओरडा, आरोप-प्रत्यारोप आणि शिवीगाळ सुरू झाली.

पोलिस हवलदार उमेश भगत, सतीश मुंडे, बंडू कोठे, शंकर चव्हाण, महिला पोलिस अंमलदार परवीन पप्पूवाले, भाग्यश्री सुपेकर, चैताली सपकाळ हे जमावाला समजावून सांगत असताना जमाव पोलिसांचे काहीही ऐकून न घेता एकमेकांना मारहाण करत आणि पोलिस स्टेशनसमोरच एकमेकांवर दगडफेक करू लागला. त्यानंतर पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी अतिरिक्त पोलिस बळाचा वापर करत गर्दी नियंत्रणात आणली. मात्र, यावेळी झालेल्या दगडफेकीत काही जण जखमी झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या प्रकरणी पोलिस हवालदार सतीश नाथराव मुंडे यांच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी हरीश राजपूत, राजू शेवाळे, गणेश भोसले, विनोद जाधव, तरबेज बोरगे, हबीब सय्यद, सलमान शेख, हफिज शेख, कलीम सय्यद, कायम सय्यद, तेजस जाधव यांसह ४० अनोळखी व्यक्ती (सर्व राहणार शिरूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करत आहेत.

Web Title : शिरूर में पथराव, हंगामा; 50 लोगों पर मामला दर्ज।

Web Summary : शिरूर पुलिस स्टेशन में दो गुटों में झड़प, पथराव और हंगामा हुआ। भीड़ को नियंत्रित करने के लिए पुलिस ने बल प्रयोग किया, जिससे कुछ लोग घायल हो गए। गैरकानूनी सभा और शांति भंग करने के आरोप में 50 लोगों पर मामला दर्ज।

Web Title : Stone pelting, chaos in Shirur; cases filed against 50 people.

Web Summary : Clash between two groups at Shirur police station led to stone pelting and chaos. Police used force to control the crowd, resulting in injuries. Cases registered against 50 individuals for unlawful assembly and disturbing peace.