शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus :'एबी' रक्तगटाचा प्लाझ्मा इतर रक्तगटांच्या कोरोनारूग्णांना देणे शक्य; पण डॉक्टरांचा सल्ला आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 15:34 IST

प्लाझ्मा थेरपीमुळे कोरोनाचे रूग्ण बरे होत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे.

ठळक मुद्देसध्या सर्वत्र प्लाझ्मा बॅग्जची मागणीत वाढ भारतामध्ये 'बी' रक्तगट हा सर्वाधिक लोकांमध्ये; त्यामुळे याच रक्तगटाची मागणी सर्वाधिक

तेजस टवलारकर  पिंपरी : एखाद्या कोरोनाच्या रूग्णाला प्लाझ्माची गरज असेल आणि त्याला त्याच्या रक्तगटाचा प्लाझ्मा उपलब्ध होत नसेल तर अशावेळी त्या  रूग्णाला एबी रक्तटाचा प्लाझ्मा दिला जाऊ शकतो. एबी पॉझिटिव्ह किंवा एबी निगेटीव्ह या दोन्हीपैकी एका रक्तगटाचा प्लाझ्मा अशा वेळी दिला जाऊ शकतो. यातून रूग्णाला  कुठलाही त्रास होत नाही. परंतु हे करताना रूग्णावर उपचार करणारा डॉक्टर आणि रक्तपेढीतीलडॉक्टर यांची सल्लामसलत होणे गरजेचे असते. अशी माहिती वायसीएम रक्तपेढीचे प्रमुख डॉ. तुषार पाटील यांनी दिली.  प्लाझ्मा थेरपीमुळे कोरोनाचे रूग्ण बरे होत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून  येत आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र प्लाझ्मा बॅग्जची मागणी वाढली आहे. काही ठिकाणी प्लाझ्माचा तुटवडा जाणवत असल्याचे दिसून येत आहे. इतर वेळी एखाद्या रूग्णाला त्याचा रक्तगट मिळत नसेल तर त्या रूग्णाला ओ या रक्तगटाचा प्लाझ्मा  देण्यात हरकत नसते. देण्याअगोदर हिमोलायसिन टेस्ट करणं आवश्यक आहे. या टेस्ट मुळे ओ रक्त गटाचा प्लाझ्मा  रूग्णाकरिता धोकादायक आहे किंवा नाही हे समजते. प्लाझ्मा  थेरपीमध्ये पाहिजे तो रक्तगट मिळत नसल्यास एबी या रक्तगटाला प्राधान्य दिले जाते. परंतु हा निर्णय उपचार करणारे डॉक्टरच घेऊ शकतात. प्लाझ्मा  थेरपी ही उपचार पध्दत वापरतांना सध्या ज्या रक्तगटला जो रक्तगट लागू होतो त्याच रक्तगटाचा प्लाझ्मा दिला आहे. प्लाझ्मा  थेरपी ही उपचार पध्दती कोणत्या रूग्णांवर करायची याचा निर्णय हा डॉक्टर घेत आहेत. ज्या रूग्णाला इतर औषधांना प्रतिसाद देत नाहीत आणि ऑक्सिजनची गरज अधिक आहे अशा रूग्णांवर प्लाझ्मा थेरपी ही उपचार पध्दत वापरली जात आहे.  भारतामध्ये 'बी' रक्तगट हा सर्वाधिक लोकांमध्ये असतो. त्यामुळे याच रक्तगटाची मागणी सर्वाधिक असते. प्लाझ्मा थेरपी विषयी सध्या मोठ्या  प्रमाणात जनजागृती केली जात आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेले रूग्ण प्लाझ्मा दान करण्याचा  निर्णय घेत आहेत. एकदा प्लाझ्मा दान केल्यावर १५ दिवसांनी पुन्हा प्लाझ्मा दान करता येऊ शकतो.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टरBlood Bankरक्तपेढीHealthआरोग्य