शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
9
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
10
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
11
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
12
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
13
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
14
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
15
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
16
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
17
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
18
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
19
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
20
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यामध्ये सामान्यांवर निर्बंध, हॉटेलमध्ये पार्ट्या मात्र बेधुंद; नियम पायदळी तुडवत गुरु रंधवाचा लाईव्ह शो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 12:16 IST

पुणे : कोरोना संसर्ग वाढत असल्याने पुण्यासह महाराष्ट्रात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. रस्त्यावर विनामास्क फिरणाऱ्याकडून दंड वसूल केला ...

पुणे : कोरोना संसर्ग वाढत असल्याने पुण्यासह महाराष्ट्रात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. रस्त्यावर विनामास्क फिरणाऱ्याकडून दंड वसूल केला जात आहे. मात्र हॉटेलमध्ये बेधुंद पार्ट्या सुरू आहेत. पुण्यातील हॉटेल कॉनराड येथे शनिवारी रात्री संगीतकार, गीतकार आणि गायक गुरु रंधावा याचा लाईव्ह शो आयोजित करण्यात आला होता. शेकडोंच्या उपस्थितीत झालेल्या या पार्टीत कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडविण्यात आले.

मंगलदास रोडवरील कॉनराड या पंचतारांकित हॉटेलमध्ये शनिवारी रात्री या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ही पार्टी नमन भुतडा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आली होती असे सांगण्यात आले. या पार्टीत गुरु रंधावा याने आपली गाणी सादर केली. त्यावेळी मोठ्या संख्येने तरुण तरुणी उपस्थित होते. बहुतांश जणांनी मास्कही परिधान केले नव्हते. २०० हून अधिक लोक उपस्थित होते. या कार्यक्रमात गुरु रंधावा याच्या गाण्यावर शेकडो तरुण नाचत होते. रात्री उशिरापर्यंत ही पार्टी चालली होती. मात्र, पोलिसांकडून त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

शासनाने सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध आणले आहेत. त्यामध्ये ५० जणांचे बंधन घालण्यात आले आहे. मात्र, या ठिकाणी कोणत्याही नियमांचे पालन करण्यात आले नसल्याचे दिसून आले. याबाबत हॉटेलचे सरव्यवस्थापक अमित मिधा यांनी आपण सुटीवर असल्याचे सांगितले. हॉटेलमधील रिस्पेशनला चौकशी केली असता त्यांनी शनिवारी रात्री गुरु रंधवा याचा कार्यक्रम झाल्याचे सांगितले. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात चौकशी केली असता याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनीही याबाबत काही माहीत नसल्याचे सांगितले

पुण्यातील अनेक हॉटेलांमध्ये रात्रीच्या पार्ट्या, पोलीस अनभिज्ञ की जाणूनबुजून दुर्लक्ष

पुण्यातील अनेक हॉटेलांमध्ये रात्रीच्या पार्ट्या सुरू आहेत. शनिवारी रात्रीही अनेक हॉटेलांमध्ये या पार्ट्या सुरू होत्या. पोलीस याबाबत अनभिज्ञ की जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. कोरेगाव पार्क येथील वॉटर रेस्टॉरंटमध्येही शनिवारी अशीच एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. याबाबतही पोलिसांकडे कोणतीही माहिती नव्हती.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या