शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

रवींद्र बऱ्हाटेच्या मालमत्ता जप्तीचे आदेश; लवकरच होणार कार्यवाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 07:20 IST

शहर व ग्रामीणमध्ये १४ हून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांची माहिती..

पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेच्या मालमत्ता जप्तीच्या आदेशाची कार्यवाही न्यायालयाने सुरु केली आहे. बऱ्हाटे विरुद्ध पकड वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यानंतरही तो मिळून आलेला नाही. त्यानंतर न्यायालयाने ३ नोव्हेंबर रोजी जाहीरनाम्याचा आदेश काढून तो पुणे शहर व परिसरामध्ये सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध केला होता. तरीही तो न मिळून आल्याने आता स्थावर मालमत्त जप्तीचे आदेश न्यायालयाकडून प्राप्त करुन घेऊन पुढील कार्यवाही पुणे पोलीस करीत आहेत.

माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बऱ्हाटे, तथाकथीत पत्रकार देवेंद्र जैन, बडतर्फ पोलीस शैलेश जगताप यांच्यासह १३ जणांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानूसार (मोक्का) कारवाई केली आहे. हडपसर येथील गुन्हयात बऱ्हाटे व त्याच्या साथीदारांनी संघटीतपणे टोळी करुन जीवे ठार मारण्याची धमकी, बंगला बळकाविण्याचा प्रयत्न केला होता. हडपसरच्या गुन्हयासह त्याच्याविरुध्द शहर व ग्रामीणमध्ये १४ हून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बऱ्हाटे व त्याच्या साथीदारांविरुध्द पहिला गुन्हा कोथरुड पोलीस ठाण्यात ७ जुलै २०२० रोजी दाखल झाला होता. बांधकाम व्यवसायिकाला बलात्काराच्या गुन्हयात अडकवण्याची धमकी देऊन २ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी त्याने केली होती. त्यानंतर १२ जुलै रोजी समर्थ पोलीस ठाण्यातही एका बांधकाम व्यवसायिकाला धमकावून त्याच्याकडून ७२ लाख रुपये घेऊन आणखी पावणेदोन कोटी रुपयांची मागणी केल्याचा गुन्हा दाखल झाला. तर तिसरा गुन्हा हडपसर पोलीस ठाण्यात दाखल झाला. त्यामध्ये कोथरुड व औंध येथील जमिनीत गुंतवणूक केल्यास दामदुप्पट पैसे मिळतील असे आमिष दाखवून एकाची ३० लाख रुपयांची फसवणूक केली होती. तर चौथा गुन्हा केटरींग व्यवसायीकाने दाखल केल्यावरुन हडपसर पोलीस ठाण्यातच दाखल झाला होता. बहुतांश गुन्हयात बऱ्हाटे व त्याच्या साथीदारांनी संघटीतपणे कट रचून नागरिकांना धमकावणे, खंडणी मागणे, मालमत्ता बळकाविणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे या स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत...........

दरम्यान हडपसर केटरींग व्यवसायीकाने दाखल केलेल्या गुन्हयात बऱ्हाटे टोळीतील फरार असलेला आरोपी गणेश मधुकर आमंदे(वय ४५, रा.टिळक रोड) याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत लोहकरे, पोलीस नाईक मोहसिन शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली. या गुन्हयामध्ये आजवर ६ आरोपी अटक केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालय