शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक काँग्रेस भवनाला ७५ वर्षे पूर्ण

By admin | Updated: January 23, 2015 00:19 IST

अनेक महत्त्वाच्या घटना-घडामोडींचे साक्षीदार असलेल्या ऐतिहासिक ‘काँगेस भवना’ला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.

पुणे : महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्यापासून मनमोहनसिंग, राहुल गांधी आदी दिग्गज नेत्यांचा सहवास लाभलेल्या... अनेक महत्त्वाच्या घटना-घडामोडींचे साक्षीदार असलेल्या ऐतिहासिक ‘काँगेस भवना’ला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने २५ ते ३१ जानेवारीदरम्यान अमृत महोत्सवी सप्ताह शहरात साजरा केला जाणार आहे. महात्मा गांधी यांच्या इच्छेनुसार देशातील प्रत्येक शहरात काँग्रेस भवन उभारण्यात आले. त्यानुसार पुण्यात एक एकर जागेवर प्रशस्त काँग्रेस भवन २६ जानेवारी १९४० रोजी उभारण्यात आले. या वास्तूला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांची माहिती शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय छाजेड व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनी दिली.महात्मा गांधींनी पुण्यातील काँग्रेस भवनाच्या उद्घाटनानिमित्त ‘यह मकान सच्चे सेवकों का याने खिदमतगारों का बने’ अशा शुभेच्छा दिल्या होत्या. त्याची फलकावर नोंद करून या इमारतीचे उद्घाटन झाले होते. काँग्रेसचे नेते काकासाहेब गाडगीळ, केशवराव जेधे, शंकरराव मोरे यांच्या संयुक्त प्रयत्नांमधून ही वास्तू उभी राहिली.शहरामध्ये २५ जानेवारी रोजी सकाळी ७५ ठिकाणी आरोग्य शिबिरे घेतली जाणार आहेत. सायंकाळी काँग्रेस भवनामध्ये ऐतिहासिक घटनांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होईल. २६ जानेवारी रोजी सकाळी ध्वजवंदन होईल. सायंकाळी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या स्रेहमेळाव्यासाठी अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. २७ जानेवारीला शहरातून प्रभात फेरी काढण्यात येईल. तसेच, ७५ अपंग सैनिकांचा सत्कार केला जाईल. २९ जानेवारी रोजी स्वातंत्र्यसैनिक कुटुंबीयांचा सन्मान केला जाईल. या वेळी काँग्रेसची मान्यवर नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. ३० जानेवारी रोजी महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित मिरवणूक काढली जाईल. ३१ जानेवारीला ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धेने याचा समारोप होईल, अशी माहिती छाजेड यांनी दिली.(प्रतिनिधी)बालक्रांतिकारक दाभाडे यांचे बलिदानकाँग्रेस भवन येथे बाल क्रांतिकारक हुतात्मा नारायण दाभाडे याने हातात घेतलेला तिरंगा खाली टाकावा म्हणून इंग्रजांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या बलिदानाने काँग्रेस भवन पुनीत झाले आहे. या आठवणीलाही उजाळा दिला जाणार आहे.