शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

एसटी स्थानक आवारातील चोऱ्यांच्या घटनांनी नागरिक बेजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 22:05 IST

शहरातील एसटी स्थानकांच्या आवारात चोरीचे सत्र अद्याप सुरुच

ठळक मुद्देज्येष्ठ महिलेच्या पिशवीतील सोन्याचे दागिने, रोकड असा २ लाख ५१ हजार रुपयांचा ऐवज लुटला

पुणे :  शहरातील एसटी स्थानकांच्या आवारात चोरीचे सत्र अद्याप सुरुच असल्याने यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. एसटी स्थानकांच्या आवारात प्रवाशांकडील ऐवज लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या परिसरात ज्येष्ठ महिलेच्या पिशवीतील सोन्याचे दागिने, रोकड असा २ लाख ५१ हजार रुपयांचा ऐवज लांबविण्याची घटना घडली. याबाबत ज्येष्ठ महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार महिला मूळची अहमदनगरची असून त्या एका कार्यक्रमाकरिता पुण्यात आल्या होत्या. सकाळी आठच्या सुमारास तिने पुणे ते औरंगाबाद या मार्गावरील एसटी बसमध्ये तिने प्रवेश  केला. तिच्याकडील असलेली बॅग तिने एसटी बसमधील लोखंडी जाळ्यावर ठेवली होती. महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्याने बॅग लांबविली. बॅगेत दागिने, रोकड, कपडे होते. बॅग चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक माने तपास करत आहेत. शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन येथील एसटी स्थानकाच्या आवारात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. प्रवाशांकडील ऐवज तसेच लॅपटॉप लांबविणाच्या घटना घडतात. काही घटनांमध्ये चोरीला ऐवज किरकोळ असल्याने प्रवासी तक्रार देण्याचे टाळतात. मध्यंतरी  स्वारगेट पोलिसांनी शिवशाही बसमधून मुंबईकडे जाणाºया प्रवाशांच्या बॅगेतील लॅपटॉप लांबविणाºया चोरट्याला अटक केली होती. चोरट्याकडून नऊ लॅपटॉप जप्त करण्यात आले होते.  तीन दिवसांपूर्वी स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात महिला प्रवाशाच्या पिशवीतील सव्वा लाख रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना घडली. याबाबत महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार महिला रायगड जिल्ह््यातील रोहा गावातील रहिवासी आहे. दिवे आगार येथे जाणाºया बसमध्ये ती प्रवेश करत होती. त्या वेळी बसमध्ये प्रवाशांची गर्दी होती. चोरट्याने गर्दीत महिलेच्या पिशवीतील १ लाख २५ हजारांचे दागिने लांबविले. महिलेच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर तिने याबाबत तक्रार दिली. पोलीस हवालदार कदम तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेtheftचोरीThiefचोरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस