हळदी समारंभ उरकून परतताना लोकांवर अचानक मधमाशांचा हल्ला; राजगड तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 16:26 IST2026-04-30T16:26:27+5:302026-04-30T16:26:46+5:30

ग्रामीण रुग्णालय वेल्हे येथे नऊ जणांना ऍडमिट केले असून यामध्ये सहा पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे, सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

Bees suddenly attack people while returning from Haldi ceremony; Incident in Rajgad taluka | हळदी समारंभ उरकून परतताना लोकांवर अचानक मधमाशांचा हल्ला; राजगड तालुक्यातील घटना

हळदी समारंभ उरकून परतताना लोकांवर अचानक मधमाशांचा हल्ला; राजगड तालुक्यातील घटना

राजगड: राजगड तालुक्यातील घिसर येथे नवरी व नवरदेव मंदिरातील हळदी समारंभ उरकून परत अचानक मधमाशांनी हल्ला केला या घटनेत नऊ जणांना उपचारासाठी वेल्हे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजगड तालुक्यातील घिसर येथे नवरदेव संकेत शिंदे व नवरी संध्याराणी धिडले यांचा विवाह आज संपन्न होणार आहे. तत्पूर्वी या गावातील जुगाई देवी मंदिरात हळद लावण्याची प्रथा आहे. ही हळद लावण्यासाठी नवरा नवरी सकाळी दहा वाजता मंदिरात गेले होते. हळद लावल्यानंतर पायवाटेने परत येत असताना वाटेत जंगलातील झूडपामध्ये लपलेल्या मधमाशांनी वीस ते पंचवीस जणांच्या घोळक्यावर हल्ला केला, अचानक हल्ला झाल्याने लोक घाबरून इकडे तिकडे सैरावैरा लागली. लग्नासाठी आलेल्या वाहनांमधूनच जखमींना वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले, असल्याची माहिती पोलीस पाटील सुनील धिडले यांनी दिली. 

ग्रामीण रुग्णालय वेल्हे येथे नऊ जणांना ऍडमिट केले आहे यामध्ये सहा पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे यांची सर्वांची प्रकृती स्थिर आहे. उपचार झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. चंद्रकांत भोईटे यांनी दिली.

Web Title : राजगढ़ में शादी समारोह पर मधुमक्खियों का हमला; नौ अस्पताल में

Web Summary : राजगढ़ के घिसर में शादी से पहले के समारोह के बाद मधुमक्खियों ने एक विवाह पार्टी पर हमला कर दिया। छह पुरुषों और तीन महिलाओं सहित नौ लोगों को वेल्हे में अस्पताल में भर्ती कराया गया। सभी की हालत स्थिर है और इलाज के बाद उन्हें छुट्टी मिलने की उम्मीद है।

Web Title : Bees Attack Wedding Party in Rajgad; Nine Hospitalized

Web Summary : A wedding party in Rajgad's Ghisar was attacked by bees after a pre-wedding ceremony. Nine people, including six men and three women, were hospitalized in Velhe. All are in stable condition and expected to be discharged after treatment.