Baramati Bypoll Election: “सुनेत्रा पवारांना मत देऊन अजितदादांना श्रद्धांजली द्या”, शरद पवारांचे बारामतीकरांना भावनिक आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 10:03 IST2026-04-22T10:02:40+5:302026-04-22T10:03:28+5:30
Baramati Bypoll Election १९६७ पासून प्रत्येक निवडणुकीत मी बारामतीत मतदानाचा हक्क बजावला. मात्र, यंदा प्रकृतीमुळे ते शक्य होत नाही, ही अत्यंत व्यथित करणारी बाब आहे

Baramati Bypoll Election: “सुनेत्रा पवारांना मत देऊन अजितदादांना श्रद्धांजली द्या”, शरद पवारांचे बारामतीकरांना भावनिक आवाहन
बारामती: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदान करण्याची दीर्घकालीन प्रथा यंदा खंडित होत असल्याची खंत व्यक्त करत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीकरांना भावनिक आवाहन केले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईत रुग्णालयात उपचार घेत असताना डॉक्टरांनी प्रवासास मनाई केल्याने यंदा मतदान करता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“१९६७ पासून प्रत्येक निवडणुकीत मी बारामतीत मतदानाचा हक्क बजावला. मात्र, यंदा प्रकृतीमुळे ते शक्य होत नाही, ही अत्यंत व्यथित करणारी बाब आहे,” असे सांगताना पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या पोटनिवडणुकीची पार्श्वभूमीही त्यांनी अधोरेखित केली. महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते स्व. अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर ही निवडणूक होत असल्याचे नमूद करत, पक्षाने सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी सांगितले. “सुनेत्रा पवार यांना मतदान करणे म्हणजे अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असे ते म्हणाले.
पुढे त्यांनी नमूद केले की, मतदानासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध आहे का, याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा केली; मात्र तसे पर्याय उपलब्ध नसल्याने अखेर मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घ्यावा लागला. बारामतीकरांनी गेली अनेक वर्षे दाखवलेला विश्वास लक्षात घेता, आपल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.