सुनेत्रा पवारांनी देशातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा रेकॉर्ड मोडला; तब्बल २ लाख १८ हजार ९३० मतांनी एकतर्फी विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 15:08 IST2026-05-04T15:07:24+5:302026-05-04T15:08:25+5:30

Baramati bypoll election 2026 २०२२ च्या निवडणुकीत सुनील कुमार शर्मांना २ लाख १४ हजार ८३५ मते मिळाली होती, त्यानंतर आता सुनेत्रा पवारांना २ लाख १८ हजार ९३० इतकी मते मिळाली आहेत

Baramati bypoll election 2026 Sunetra Pawar breaks the record for the largest vote margin in the country; wins unilaterally by a whopping 2 lakh 18 thousand 930 votes | सुनेत्रा पवारांनी देशातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा रेकॉर्ड मोडला; तब्बल २ लाख १८ हजार ९३० मतांनी एकतर्फी विजय

सुनेत्रा पवारांनी देशातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा रेकॉर्ड मोडला; तब्बल २ लाख १८ हजार ९३० मतांनी एकतर्फी विजय

पुणे : बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देशातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा रेकॉर्ड मोडला आहे. बारामतीच्या पोटनिवडणुकीत 24 व्या फेरी अखेर सुनेत्रा पवारांना २ लाख १८ हजार ९३० इतकी मते मिळाली आहेत. उत्तर प्रदेशच्या साहिबाबाद मधील सुनील कुमार शर्मा यांचा रेकॉर्ड सुनेत्रा पवारांनी मोडला आहे. २०२२ च्या निवडणुकीत सुनील कुमार शर्मांना २ लाख १४ हजार ८३५ मते मिळाली होती. २४ व्या फेरी अखेर सुनेत्रा पवार यांना बारामती पोटनिवडणुकीत २ लाख १८ हजार ९३० मते मिळाली आहेत. 

तब्बल २ लाख मताधिक्याचा विक्रमी टप्पा पार करत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी एकतर्फी विजय मिळवला आहे. बारामती पोटनिवडणुकीसाठी अवघे ५८.१७ टक्के मतदान झाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर प्रमुख राजकीय पक्षांचा एकही उमेदवार नसल्याने महायुतीकडून विक्रमी मताधिक्याचा दावा करण्यात येत होता. आता सर्वाधिक मताधिक्य मिळवून सुनेत्रा पवार बारामतीच्या इतिहासात आपले नाव कोरले आहे.  

अजित पवारांचा विक्रम मोडला 

बारामतीतील मताधिक्याचा विक्रम दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर होता. २०१९ मध्ये त्यांनी भाजपचे तत्कालीन उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा एक लाख ६५ हजार २६५ मताधिक्याने पराभव केला होता. त्यामुळे आता विक्रम मोडण्यासाठी एक लाख ६५ हजार २६६ हा जादुई आकडा लागणार होता. तो विक्रमही सुनेत्रा पवार यांनी मोडला आहे. राष्ट्रीय पातळीवर सुनेत्रा पवार यांना मिळालेल्या मतांची नोंद झाली आहे.  

या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी माघार घेतल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर २२ उमेदवार होते. त्यामध्ये प्रमुख राजकीय पक्षाचा एकही उमेदवार नाही. नोंदणीकृत राजकीय पक्ष असलेल्या न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे आर. वाय घुटूकडे हे होते. ते मूळचे सोलापूरमधील आहे. हिंदुस्थान जनता पार्टीचे सतीश कदम हे उमेदवार होते. ते जत येथील आहेत. उर्वरित २० जण हे अपक्ष होते. त्यामध्ये बारामतीतील आठजण आहेत. अन्य अपक्ष हे बारामतीबाहेरील आहेत. त्यात धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे आणि ‘बिग बॉस मराठी’मधील अभिजित बिचुकले यांचा समावेश आहे. या सर्व २२ जणांना मिळून ४ हजार ८३७ मते मिळाली आहेत. 

Web Title : सुनेत्रा पवार ने बारामती उपचुनाव में विशाल जीत के साथ रिकॉर्ड तोड़ा

Web Summary : सुनेत्रा पवार ने बारामती उपचुनाव में रिकॉर्ड तोड़ जीत हासिल की, जो भारत में सबसे बड़े अंतर को पार कर गई। उन्होंने 2,18,930 वोट हासिल किए और सुनील कुमार शर्मा का पिछला रिकॉर्ड तोड़ा। पवार ने अजित पवार के 2019 के जीत के अंतर को भी पार कर लिया।

Web Title : Sunetra Pawar Breaks Record with Massive Victory in Baramati By-election

Web Summary : Sunetra Pawar secured a record-breaking victory in the Baramati by-election, surpassing the highest margin in India. She garnered 2,18,930 votes, defeating Sunil Kumar Sharma's previous record. Pawar exceeded Ajit Pawar's 2019 victory margin, solidifying her position in Baramati's history with this significant win.