शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पाला निरोपाची तयारी पूर्ण

By admin | Updated: September 26, 2015 02:42 IST

गणेश विसर्जनासाठी महापालिकेच्या वतीने नदीच्या सर्व घाटांवर पाण्याचे होद, निर्माल्य कलश तसेच जीवरक्षकांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

पुणे : गणेश विसर्जनासाठी महापालिकेच्या वतीने नदीच्या सर्व घाटांवर पाण्याचे होद, निर्माल्य कलश तसेच जीवरक्षकांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. अलका चित्रपटगृह चौकात महापालिकेच्या वतीने मिरवणुकीतील प्रत्येक मंडळाचे स्वागत करून पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला जाईल.महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांनी त्यांच्या हद्दीतील सर्व विसर्जन घाटांवर स्वच्छता करून घेतली आहे. कीटकनाशकाची फवारणी, गवत काढून परिसर स्वच्छ करणे ही कामे गेल्या काही दिवसांत प्राधान्याने करून घेण्यात आली आहेत. ज्या परिसरात नदी, तलाव, किंवा विहिरी नाहीत तिथे हौद तयार करून त्यात पाणी सोडण्यात आले आहे. त्याचबरोबर भाविकांनी बरोबर आणलेले निर्माल्य पाण्यात टाकून प्रदूषण वाढू नये यासाठी विसर्जनाच्या सर्व ठिकाणी मोठे निर्माल्य कलशही ठेवण्यात आले आहेत. भाविकांनी त्यातच निर्माल्य जमा करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.आरोग्य विभागाने मिरवणुकीतील कार्यकर्त्यांना काही शारीरिक त्रास झाला तर त्वरित वैद्यकीय मदत मिळावी यासाठी वैद्यकीय पथकांची स्थापना केली आहे. डेक्कन जिमखाना (जुन्या नटराज चित्रपटगृहाजवळ) व लक्ष्मी रोडवर नूतन मराठी विद्यालयाजवळ हे वैद्यकीय पथक असेल. मिरवणूक सुरू झाल्यापासून ती पूर्ण होईपर्यंत ही पथके कार्यरत असतील. या पथकांमध्ये तीन शिफ्टमध्ये स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी, नर्स, शिपाई तसेच वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. शहराच्या मध्यभागात नदी असल्याने गणेश विसर्जनाची अडचण येत नाही. उपनगरांमध्ये अशी काही व्यवस्था नसल्याने महापालिकेकडून क्षेत्रीय कार्यालयातंर्गत हौदांची व्यवस्था करण्यात आली आहे. ही व्यवस्था पुढीलप्रमाणे आहे. वारजे कर्वे रोड कार्यालय : राजारामपूल, सूर्यनंदा लॉन, सिद्धेश्वर घाट, हॅप्पी कॉलनी, मनमोहन सोसायटी, अतुलनगर, गांधीभवन, कोथरूड. या सर्व ठिकाणी महापालिकेने जनरेटर्सची व्यवस्था करून दिलेली आहे. बिबवेवाडी कार्यालय : प्रभाग क्रमांक ६४, गंगुबाई भिमाले उद्यान, सॅलीसबरी पार्क, वृंदावन सोसायटी, यशवंतराव चव्हाण शाळा, गंगाधाम चौक, शहा प्लॉट. या सर्व ठिकाणी महापालिकेने निर्माल्य कलशांसहित हॅलोजन दिवे तसेच जनरेटर, कचऱ्यासाठी कंटेनर अशी व्यवस्था करून दिली आहे.