शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या हद्दीत पीएमआरडीएला काम करण्यास मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 12:46 IST

पीएमआरडीएच्या वतीने हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोचे काम करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देस्थायी समितीत मान्य : हिंजवडी ते शिवाजीनगर तिसरा मेट्रो प्रकल्प 

पुणे : पुणेमेट्रोच्या हिंजवडी ते शिवाजीनगर या तिसºया प्रकल्पाचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) मार्फत करण्यात येणार आहे. हे काम करताना महापालिकेच्या हद्दीत काम करण्यासाठी पीएमआरडीएला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याची माहिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली. पीएमआरडीएच्या वतीने हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोचे काम करण्यात येणार आहे. हे काम करताना प्रस्तावित स्थानके व मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या जिन्यांचे स्थान नकाशावर दर्शविल्याप्रमाणे मुख्य रस्त्याला जोडण्यासाठी परवानगी, प्रस्तावित मेट्रोसाठी सर्वसाधारण मार्गिका रुंदी जागा उपलब्धता अंतिम विकास आराखड्यातील रस्त्यामध्ये रेषेप्रमाणे जागा उपलब्ध करून देणे, महापालिका हद्दीतील रस्त्याखालील जागा विनामोबदला, विनाअडथळा उपलब्ध करूने देणे व स्टेशन जिन्यासाठी आवश्यक जागा, महापालिकेच्या मालमत्ता व व्यवस्थापन विभागाकडून योग्य त्या मोबदल्यात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास मालकी हक्काने हस्तांतरीत करणे, या प्रकल्पासाठी महापालिका हद्दीतील आवश्यक खाजगी जमिनीचे संपादन आवश्यक तेथे एफएसआय किंवा टीडीआर स्वरुपात आणि जेथे एफएसआय किंवा टीडीआर स्वरूपात जागा ताब्यात येणार नाही तेथे पीएमआरडीएच्या खर्चाने करणे. पुणे महापालिकेच्या अंतिम विकास आराखड्यातील प्रस्तावित रस्ता रुंदीनुसार जागा उपलब्ध करून देणे, पुणे विद्यापीठ चौकातील एचसीएमटीआरच्या आखणीच्या ठिकाणी सुयोग्य नियोजन करुन देणे, या कामामुळे बाधित होणाऱ्या सेवा वाहिन्यांचे स्थलांत पीएमआरडीएने स्वखर्चाने व संबंधित विभागांच्या मार्गदर्शन व देखरेखीखाली करणे, मेट्रो तीन प्रकल्पामधून मेट्रो एक व मेट्रो २ प्रकल्पांपर्यंत वाहतूक संक्रमण व्यवस्था कामे पीएमआरडीएच्या खर्चाने करणे, मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लगतच्या आवश्यक त्या परवानग्या पीएमआरडीएने स्वखर्चाने घेणे, तांत्रिक निकषांनुसार व आवश्यकतेनुसार हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानच्या मेट्रो मार्गामध्ये आवश्यक ते फेरबदल तसेच मान्य विकास आराखड्यातील रस्त्याच्या आखणी व्यतिरिक्त आवश्यकतेनुसार मेट्रो मार्ग आखणी करणे, प्रस्तावित मेट्रो तीन मार्गाच्या आखणीबाबत टीओडी धोरणाबाबत शासनाच्या आदेशानुसार कार्यवाही करणे, आदी कामांसाठी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

टॅग्स :PuneपुणेPMRDAपीएमआरडीएPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMetroमेट्रो