शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

​Navale Accident: नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; रम्बलर्समुळे (गतिरोधक पट्टे) कार उलटली, सुदैवाने जीवितहानी टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 10:54 IST

वेगात असलेल्या वाहनांना अचानक रम्बलर्सचा अंदाज न आल्याने किंवा त्यावर ब्रेक दाबल्याने गाडीचा ताबा सुटल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे

Pune Accident Nawale Bridge: मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील नऱ्हे येथील नवले पूल परिसर अपघातांचे केंद्र बनत चालला असून, आज (गुरुवारी) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास येथे पुन्हा एक थरारक अपघात घडला. वेगात असलेली एक कार अचानक पलटी झाली. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेनऊच्या सुमारास एक कार मुंबईच्या दिशेने जात होती. नवले पूल परिसरातील उतारावर ही कार आली असता चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार महामार्गावरच पलटी झाली. अपघातावेळी परिसरात वाहनांची वर्दळ होती, मात्र इतर कोणत्याही वाहनाला याची धडक न बसल्याने मोठा अनर्थ टळला. ​अपघाताची माहिती मिळताच सिंहगड रस्ता वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त कार रस्त्याच्या बाजूला असल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी झाली नाही. मात्र पोलिसांनी तातडीने क्रेन पाचारण करून कार बाजूला घेण्याचे काम सुरू केले, जेणेकरून पूर्णपणे वाहतूक सुरळीत होईल.

​प्राथमिक अंदाजानुसार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नवले पूल परिसरात वाहनांचा वेग कमी करण्यासाठी बसवलेले 'रम्बलर्स' (गतिरोधक पट्टे) या अपघाताला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. ​वेगात असलेल्या वाहनांना अचानक रम्बलर्सचा अंदाज न आल्याने किंवा त्यावर ब्रेक दाबल्याने गाडीचा ताबा सुटल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. ​यापूर्वीही अनेक वाहनचालकांनी या रम्बलर्समुळे वाहने अनियंत्रित होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Navale Bridge Accident: Car Flips Due to Rumble Strips, No Injuries

Web Summary : Another accident occurred near Navale Bridge due to rumble strips, flipping a car. Fortunately, no one was injured, but the car was heavily damaged. Speed and the unexpected rumble strips are suspected causes, prompting previous complaints.
टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातSocialसामाजिकcarकारroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका