माणुसकीला काळिमा फासणारी घटना; पुण्यात स्कुल व्हॅन चालकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 13:54 IST2024-10-03T13:54:06+5:302024-10-03T13:54:29+5:30

धक्कादायक म्हणजे चालक चार दिवस त्या चिमुरडीसोबत तसेच तिच्या मैत्रीण यांच्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याचे समोर आले आहे

An event that blackened humanity A minor girl was sexually assaulted by a school van driver in Pune | माणुसकीला काळिमा फासणारी घटना; पुण्यात स्कुल व्हॅन चालकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

माणुसकीला काळिमा फासणारी घटना; पुण्यात स्कुल व्हॅन चालकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

वानवडी : नवरात्री उत्सवाच्या सुरुवातीलाच पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. अल्पवयीन मुलींसोबत स्कूल बस चालकाने लैंगिक अत्याचार करुन धमकवण्याची घटना समोर आली आहे. अत्याचार प्रकरणी संजय रेड्डी (वय ४५, रा. वैदूवाडी, रामटेकडी) या  नराधमावर वानवडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले आहे.
       
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार ३० सप्टेंबर रोजी शाळा सुटल्यानंतर स्कूल व्हॅन मध्येच नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत प्रायव्हेट पार्टच्या जागी स्पर्श केले. धक्कादायक म्हणजे बस चालक चार दिवस त्या चिमुरडीसोबत तसेच तिच्या मैत्रीण यांच्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याचे समोर आले आहे. बदलापूर येथील घटना घडुन काही दिवस झाले असताना पुण्यात अशी धक्कादायक घटना घडल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्या नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वानवडी पोलीस करत आहेत.

Web Title: An event that blackened humanity A minor girl was sexually assaulted by a school van driver in Pune