शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

'साहेबां'च्या एका कॉलनंतर अजितदादा बारामतीमधून मुंबईसाठी रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 15:00 IST

उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांचेच नाव निश्चित झाल्याची चर्चा...

ठळक मुद्देमंत्रिमंडळ विस्ताराबाबत हालचाली सुरु झाल्याने तातडीने ते मुंबईला रवाना

बारामती : राज्यातील सत्ताबदलानंतर बारामती शहरात प्रथमच अजित पवार गुरुवारी(दि ५) त्यांच्या सहयोग येथील निवासस्थानी मुक्कामी पोहचले होते.आज सकाळी पवार यांचे कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांनी जोरदार स्वागत देखील केले.त्यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी झाली होती .मात्र, पवार आज बारामती दौरा अचानक अर्धवट सोडून तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले.त्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा फोन आल्याने ते मुंबईला रवाना झाल्याची चर्चा होती.

 उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांचेच नाव निश्चित झाल्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगली आहे. त्यानंतर पवार यांना अर्थ किंवा गृह खाते मिळणार असल्याची चर्चा रंगली होती.मात्र, अधिवेशनानंतरच मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याने बारामतीकरांना त्यादिवसाची प्रतीक्षा होती.

काल अचानकच अजितदादा बारामती येथील निवासस्थानी पोहचले. सकाळी सात वाजल्यापासुनच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्याशी चर्चा केली. विविध कामे मार्गी लावण्याबाबत  त्यांनी सुचना केल्या.यावेळी शहरातील कार्यकर्ते,नागरीकांनी त्यांची भेट घेण्यासाठी,शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती.यावेळी सर्व विभागाचे वरीष्ठ शासकीय अधिकाऱ्यांसह, सर्व संस्थांचे प्रमुख पवार यांच्या भेटीसाठी आवर्जुन उपस्थित होते . येथील दौऱ्यादरम्यान, बारामती नगरपालिकेच्या नगरसेवकांसोबत त्यांची बैठक ठरली होती, त्यानंतर सोमेश्वर कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांसोबत पवार चर्चा करणार होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहावर ही बैठकीची तयारी करण्यात आली होती. 

मात्र, संपुर्ण दौरा अर्धवट सोडुन  आज सकाळी मुंबईला निघून गेल्याने विविध चर्चा रंगल्या. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत हालचाली सुरु झाल्याने तातडीने ते मुंबईला रवाना झाल्याची यावेळी प्रामुख्याने चर्चा रंगली. एक फोन आल्यानंतर  पवार तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा फोन आल्याने अजितदादा तातडीने  मुंबईला गेल्याची चर्चा होती. 
 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसGovernmentसरकार