बारामती पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; ४७८ मतदान केंद्रांवर काटेकोर तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 09:53 IST2026-04-22T09:52:17+5:302026-04-22T09:53:21+5:30

सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे सतत नजर ठेवली जाणार आहे.

Administration ready for Baramati by-election; Strict preparations at 478 polling stations | बारामती पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; ४७८ मतदान केंद्रांवर काटेकोर तयारी

बारामती पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; ४७८ मतदान केंद्रांवर काटेकोर तयारी

बारामती : बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार असून या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्वंकष आणि सुस्थितीत तयारी पूर्ण केली आहे. मतदान प्रक्रिया पारदर्शक, निर्भय आणि सुरळीत वातावरणात पार पडावी, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी दिली.

या पोटनिवडणुकीसाठी अत्याधुनिक मतदान यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांची व्यवस्था करण्यात आली असून, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच, सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे सतत नजर ठेवली जाणार आहे.
बारामती मतदारसंघात एकूण ३ लाख ८४ हजार ५७९ मतदार नोंदणीकृत आहेत. यामध्ये १ लाख ९३ हजार ८७१ पुरुष, १ लाख ९० हजार ६८४ महिला आणि २४ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. या सर्व मतदारांसाठी ४७८ मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेसाठी ४७८ ईव्हीएम, ९५६ बॅलेट युनिट्स आणि ४७८ व्हीव्हीपॅट यंत्रे केंद्रांवर उपलब्ध असणार आहेत. याशिवाय अतिरिक्त म्हणून ६० ईव्हीएम व व्हीव्हीपॅट आणि १२० बॅलेट युनिट्स राखीव ठेवण्यात आले आहेत.

निवडणूक कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी १६५ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी ६० वाहने, मतदान यंत्रे व साहित्य वाहतुकीसाठी ६० बंदिस्त मिनी टेम्पो आणि कर्मचाऱ्यांच्या ये-जा करण्यासाठी ४५ बसेसची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वैद्यकीय संच आणि मंडप यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
आचारसंहितेचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने ८ तपासणी नाके (चेकपोस्ट) उभारले असून, १६ स्थिर पथके आणि ८ फ्लाइंग स्क्वॉड कार्यरत ठेवण्यात आले आहेत. या कामासाठी एकूण ९६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, या पोटनिवडणुकीची मतमोजणी ४ मे २०२६ रोजी एमआयडीसी, बारामती येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे. नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करून निवडणूक प्रक्रियेस सहकार्य करावे, तसेच सर्व पात्र मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी केले आहे.

Web Title : बारामती उपचुनाव: प्रशासन मतदान केंद्रों पर सख्त तैयारियों के साथ तैयार

Web Summary : बारामती उपचुनाव 23 अप्रैल, 2026 को; प्रशासन 478 मतदान केंद्रों के साथ तैयार है। 3.84 लाख से अधिक मतदाता पंजीकृत हैं। वेबकास्टिंग, सीसीटीवी निगरानी और पुलिस सुरक्षा मौजूद है। मतगणना 4 मई को।

Web Title : Baramati By-Election: Administration Ready with Strict Preparations at Polling Booths

Web Summary : Administration gears up for Baramati by-election on April 23, 2026, with 478 polling booths. Over 3.84 lakh voters are registered. Webcasting, CCTV surveillance, and police security are in place. Counting on May 4.